International Yoga Day 2024 : नियमित योगा करतात 'या' फिटनेस फ्रीक अभिनेत्री; चाळीशी ओलांडली तरीही दिसतात फिट

Bollywood celebrities who do yoga: अनेक फिटनेस फ्रीक अभिनेत्री योगा करतात. जाणून घेऊयात अशा अभिनेत्रींबद्दल ज्या योगा केल्यामुळे नेहमीच फिट आणि फ्रेश वाटतात.
जिममध्ये वर्क आऊट नाही तर योगा करतात 'या' अभिनेत्री; वयाशी चाळीशी ओलांडली तरीही दिसतात फिट
International Yoga Day 2024 sakal

International Yoga Day 2024 : संपूर्ण देशभरात आज ( 21 जून) आंतरराष्ट्रीय योग दिवस (International Yoga Day 2024) साजरा केला जात आहेत. अनेक सेलिब्रिटींनी योगा आणि मेडिटेशनमुळे त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये झालेल्या बदलाबद्दल विविध मुलाखतींमध्ये सांगितलं आहे. अनेक फिटनेस फ्रीक अभिनेत्री योगा करतात. जाणून घेऊयात अशा अभिनेत्रींबद्दल ज्या योगा केल्यामुळे नेहमीच फिट आणि फ्रेश वाटतात.

मलायका अरोरा (Malaika Arora)

मलायका अरोरा ही तिच्या फिटनेसमुळे अनेकांचे लक्ष वेधते. वय हा केवळ आकडा आहे, हे मलायकानं सिद्ध केलं आहे. वयाच्या 50 व्या वर्षी देखील ती खूप फिट दिसते. तिच्या फिटनेसचं सिक्रेट योगा आहे. मलायका ही योगा केल्यामुळे फिट आणि फ्रेश दिसते. ती अनेक वेळा सोशल मीडियावर योगा करतानाचे व्हिडीओ शेअर करते.

करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan)

बॉलिवूड सुपरस्टार करीना कपूर खान ही देखील नियमित योगा करते. गर्भधारणेनंतर, करिनानं तिच्या फिटनेसाठी आणि मानसिक आरोग्यासाठी योगा करण्यास सुरुवात केली. करीना देखील सोशल मीडियावर विविध योगासन करतानाचे व्हिडीओ शेअर करते.

शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty Kundra)

शिल्पा शेट्टी ही बॉलिवूडमधील फिटनेस फ्रीक अभिनेत्रींपैकी एक आहे. शिल्पा शेट्टीच्या अनेक योगा DVD'S आहेत. तसेच सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करुन ती अनेकवेळा चाहत्यांना योगा करण्याचे फायदे सांगत असते. शिल्पा शेट्टी ही हेल्दी लाईफस्टाईल जगते. योगा आणि डाएट हे शिल्पाच्या फिटनेसमागील रहस्य आहे.

सुष्मिता सेन (Sushmita Sen)

माजी मिस युनिव्हर्स आणि अभिनेत्री सुष्मिता सेन ही देखील नियमित योगा करते. सुष्मिता सोशल मीडियावर विविध आसन करतानाचे व्हिडीओ शेअर करते.तसेच चाहत्यांना ती योगाचे महत्व देखील सांगते.

जिममध्ये वर्क आऊट नाही तर योगा करतात 'या' अभिनेत्री; वयाशी चाळीशी ओलांडली तरीही दिसतात फिट
International Yoga Day 2024: किडनीच्या आरोग्यासाठी 'या' 4 योगासनांचा करा सराव

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com