Ishq Vishk Rebound : इश्क विष्कच्या रिमेकला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळेना! जाणून घ्या बॉक्स ऑफिस कलेक्शन

Ishq Vishk Rebound Box Office Collection : नुकत्याच रिलीज झालेल्या इश्क विष्क रिबाऊंड सिनेमा बॉक्स ऑफिसवर जादू दाखवू शकला आहे की नाही जाणून घेऊया.
Ishq Vishk Rebound Box Office
Ishq Vishk Rebound Box OfficeEsakal

Ishq Vishk Rebound : शाहिद कपूर (Shahid Kapoor), अमृता राव (Amruta Rao) यांची मुख्य भूमिका असलेला 'इश्क विश्क' (Ishq Vishk) या सिनेमाचा सिक्वेल नुकताच प्रदर्शित झाला. रोहित सराफ (Rohit Saraf), पश्मिना रोशन (Pashmina Roshan), नाईला गरेवाल (Naila Garewal), जिब्रान खान (Jibran Khan) यांची मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर मात्र कमाल दाखवू शकला नाहीये. मीडिया रिपोर्टनुसार, या सिनेमाने पहिल्या दिवशी फक्त 1 करोडची कमाई केली आहे. तर शनिवारी 1.15 करोडची कमाई करण्यात हा सिनेमा यश मिळवू शकलाय. आतापर्यंत या सिनेमात 2. 15 करोड इतकी कमाई केली आहे.

निपुण धर्माधिकारी याने या सिनेमाचे दिग्दर्शन केलं असून कॉलेजवयातील प्रेम, मैत्री याच थीमवर हा सिनेमा आधारित आहे. जिब्रान, नाईला आणि पश्मिना या सिनेमातून पदार्पण करत आहेत. तर रोहितचा मुख्य अभिनेता म्हणून पहिलाच सिनेमा आहे.

Ishq Vishk Rebound Box Office
Salman Khan : टॉम क्रूझच्या 'मिशन इम्पॉसिबल'च्या टीमबरोबर करणार सलमान खान काम

शाहिद आणि अमृताच्या इश्क विष्क फ्रॅंचाईजमधील हा दुसरा सिनेमा असून Gen Z ची लव्हस्टोरी या सिनेमातुन मांडण्यात आली आहे. दोन बेस्ट फ्रेंड्स एकमेकांच्या प्रेमात पडतात आणि पुढे काय होतं? हे या सिनेमातून पाहायला मिळणार आहे.

विशेष म्हणजे हा सिनेमा आतापर्यंत बॉलिवूडमध्ये रिलीजमध्ये झालेल्या सिनेमांपैकी सगळ्यात लहान कालावधी असलेला हा सिनेमा आहे. अवघ्या 106 मिनिटांचा म्हणजे 1 तास 46 मिनिटांचा हा सिनेमा आहे.

Ishq Vishk Rebound Box Office
Ishq Vishk Rebound Review: गुंतता गुंतता विस्कटलेली लव्हस्टोरी; कसा आहे 'इश्क विश्क रिबाउंड'? वाचा रिव्ह्यू

मराठी अभिनेता आणि दिग्दर्शक निपुण धर्माधिकारीने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं असून त्याने या सिनेमाचं सहलेखनही केलं आहे. तर या सिनेमाची कथा वैशाली नाईक, केतन पेडगावकर आणि विनय चव्वल यांनी लिहिली आहे तर पेन इंडियाने या सिनेमाची निर्मिती केली आहे.

Ishq Vishk Rebound Box Office
Ishq Vishk Rebound: 30 वर्षापूर्वीच्या 'गोर गोर मुखडे पे' गाण्याचा रिमेक; इश्क विश्क रिबाउंड'मधील गाण्याची सर्वत्र चर्चा

रोहितने या आधी बऱ्याच बॉलिवूड सिनेमांमध्ये आणि वेब सिरीजमध्ये काम केलं असून मिसमॅच या वेबसिरीजमधील त्याचं काम गाजलं होतं तर पश्मिना ही अभिनेता हृतिक रोशनची चुलत बहीण आहे. जिब्रानने कभी खुशी कभी गम सिनेमात बालकलाकार म्हणून काम केलं होतं. शाहरुख आणि काजोलच्या मुलाची भूमिका त्याने साकारली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com