Mihika Shah : शाहिद कपूरच्या ऑनस्क्रीन आईवर कोसळला दुःखाचा डोंगर , २४ वर्षांच्या तरुण मुलीचं झालं निधन

Divya Seth's Daughter Demise : बॉलिवूड अभिनेत्री दिव्या शाह यांच्या तरुण मुलीचं निधन झालं. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांनी याबाबतची बातमी शेअर केली.
Divya Shah
Divya ShahEsakal
Updated on

Mumbai : बॉलिवूडमध्ये विविध सिनेमात काम करून स्वतःचा ठसा उमटवणाऱ्या अभिनेत्री दिव्या शाह यांच्यवर दुःखाचा डोंगर कोसळला. दिव्या यांची तरुण मुलगी मिहिकाचं निधन झालं. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांनी मुलीच्या निधनाची बातमी शेअर केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मिहिकाला ताप आला होता त्यानंतर फिट आल्यामुळे तिचं निधन झालं.

Divya Shah
Virat Kohli & Shah Rukh Khan : सगळीकडे किंग कोहलीचा बोलबाला ! जाहिरात क्षेत्रात विराट ठरला आघाडीचा सेलिब्रिटी ; शाहरुखलाही टाकलं मागे

दिव्या शाह यांची पोस्ट

मिहिकाच्या निधनाची बातमी दिव्या यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सगळ्यांना दिली. "आम्हाला तुम्हाला कळवण्यात अतिशय दुःख होतं आहे कि, आमच्या लाडक्या मिहिकाचं ५ ऑगस्ट २०२४ ला निधन झालं. " अशी पोस्ट त्यांनी लिहिली होती. तसंच मिहिकाच्या स्मरणार्थ ८ ऑगस्ट २०२४ ला शोकसभेचं आयोजन करण्यात आल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.

मिहिका ही बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेत्री सुषमा सेठ यांची नात होती. सुषमा यांनी 'कभी ख़ुशी कभी गम', 'चल मेरे भाई', 'कल हो ना हो', 'नगिना','स्टुडंट ऑफ द इयर' या सिनेमांमध्ये काम केलं होतं. मिहिकाचं अजून शिक्षण सुरु होतं आणि मीडियापासून दूर राहणंच पसंत करत होती.

Divya Shah
Shahid Kapoor: शाहिद कपूर पहिल्यांदा भेटला तेव्हा त्याचं आडनाव वेगळं होतं.. निर्मात्याने सांगितली खास आठवण

तर दिव्या यांनी आजवर अनेक बॉलिवूड सिनेमांमध्ये आणि वेब सिरीजमध्ये काम केलं आहे. 'जब वी मेट' या सिनेमात त्यांनी शाहिदच्या आईची भूमिका साकारली होती. 'दिल धडकने दो','इंग्लिश विंग्लिश' , 'आर्टिकल ३७०' या सिनेमांमध्ये काम केलं होतं. 'देख भाई देख', 'बनेगी अपनी बात' यांसारख्या मालिकांमध्ये काम केलं होतं. तर 'दुरंगा' या वेबसिरीजमध्ये त्यांनी काम केलं होतं.

Divya Shah
Shahrukh Khan : शाहरुखला मिळाला रुग्णालयातून डिस्चार्ज ; हॉस्पिटलमधून बाहेर पडतानाचा व्हिडीओ व्हायरल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.