Raja Rani: ‘राजा- राणी’ मालिकेतील 'हा' कलाकार साकारणार शनिदेवांची भूमिका, प्रोमोने वेधलं लक्ष

Raja Rani: नुकताच ‘जय जय शनिदेव’ या मालिकेचा प्रोमो सोशल मीडियावर प्रेक्षकांच्या भेटीस आला.
 ‘राजा- राणी’ मालिकेतील 'हा' कलाकार साकारणार शनिदेवांची प्रमुख भूमिका, प्रोमोने वेधलं लक्ष
Jai Jai Jai Shanidev esakal
Updated on

Raja Rani: कलर्स मराठीवरील ‘राजा राणीची गं जोडी’ (Raja Ranichi Ga Jodi) ही प्रेक्षकांची लाडकी मालिका. २०१९ साली प्रेक्षकांच्या भेटीस आलेल्या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली. मालिकेचं कथानक, कलाकार यांना प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं. पोलीस अधिकारी आणि गावातील अल्लड तरुणी यांची हटके लव्हस्टोरी प्रेक्षकांना खूप आवडली. पोलीस अधिकारी असलेल्या तरुणाचं अल्पवयीन मुलीशी लग्न होतं आणि पुढे त्यांची कहाणी या मालिकेत दाखवण्यात आलं.

मणिराज पवार आणि शिवानी सोनार यांची मुख्य भूमिका असलेल्या या मालिकेतील अमेय वर्दे ही पोलीस सबइन्स्पेक्टरची भूमिका खूप गाजली. संकेत खेडकर या अभिनेत्याने साकारलेली ही भूमिका सगळ्यांना खूप आवडली. आता या मालिकेनंतर संकेत एका वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. सोनी मराठीवर लवकरच सुरु होणाऱ्या ‘जय जय शनिदेव’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

नुकताच या मालिकेचा प्रोमो सोशल मीडियावर प्रेक्षकांच्या भेटीस आला. शनिदेवांवर ही मालिका आधारित असून संकेत शनी देवांच्या मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ८ मे २०२४ पासून ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येते आहे. “सूर्यपुत्र, न्यायदाते आणि अवघ्या जगाचे कर्मदाते शनिदेवांची महागाथा...” असं कॅप्शन मालिकेच्या प्रोमोला देण्यात आलं आहे. सोमवार ते शुक्रवार रात्री ९:३० वाजता ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. प्रोमोमध्ये शनिदेव “जिथे सत्य आहे तिथेच मी आहे” असं म्हणताना दिसत आहेत.

 ‘राजा- राणी’ मालिकेतील 'हा' कलाकार साकारणार शनिदेवांची प्रमुख भूमिका, प्रोमोने वेधलं लक्ष
Sonali and Mrunmayee : सोनाली-मृण्मयी दिसणार ‘या’ नव्या सिनेमात

या प्रोमोला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. अनेकांनी या प्रोमोवर कमेंट करत ही मालिका बघण्यासाठी ते उत्सुक आहेत असं त्यांनी म्हंटलं. या प्रोमोवर संकेतच्या अनेक सेलिब्रिटी मित्रांनी कमेंट करत त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. त्याचे मित्र आकाश नलावडे, मणिराज पवार, अनुष्का सरकटे यांनी कमेंट करत त्याला त्याच्या या मालिकेसाठी शुभेच्छा दिल्या.

संकेतने ललित कला केंद्र, पुणे येथे नाट्यशास्त्राचं शिक्षण घेतलं आहे. या शिवाय तो त्याच्या मिमिक शोसाठीही प्रसिद्ध आहे. तसेच तो खडू कोरून अनेक कलाकृती सुद्धा तयार करतो तसेच तो लहान मुलांसाठी अभिनयाचे वर्कशॉप्सही घेतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.