Gharoghari Matichya Chuli: दहा वर्षांनी पुन्हा केलं लग्न, मालिकेतील लग्नातल्या लूकने वेधलं लक्ष

Gharoghari Matichya Chuli New Twist : स्टार प्रवाहवरील घरोघरी मातीच्या चुली मालिकेत रणदिवेंच्या घरातील रहस्य जानकी-हृषिकेशला समजणार आहे. काय आहे हे रहस्य जाणून घेऊया.
Star Pravah Serial New Twist
Star Pravah Serial New TwistEsakal
Updated on

Star Pravah : सध्या अंबानींच्या घरातील लग्न हा सर्वत्र चर्चेचा विषय असतानाचा मराठी मालिकाविश्वातील एक लग्न सध्या चर्चेत आहे. स्टार प्रवाह वाहिनीवरील घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत सध्या लग्नसराई सुरु आहे. ऋषिकेश आणि जानकी यांच्या लग्नाला दहा वर्षे पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने दोघं पुन्हा एकदा लगीनगाठ बांधणार आहेत. या लग्नासाठीचे विविध कार्यक्रम सध्या मालिकेत पाहायला मिळत आहेत. या लग्नाच्या धामधूमीत इतर मालिकांमधील कलाकार देखील सहभागी होताना दिसत आहेत.

ऋषिकेश आणि जानकीचा मेहंदी, हळद आणि संगीत सोहळा थाटात पार पडल्यानंतर आता उत्सुकता आहे ती विवाहसोहळ्याची. जानकी-ऋषिकेशने य लग्नात सोनेरी रंगाच्या पेहरावाला पसंती दिली असल्याचं पाहायला मिळतय. सोनेरी रंगाची साडी आणि मोत्याचे दागिने परिधान करत जानकी वधूच्या रुपात सुंदर नटलीय, तर तिकडे ऋषिकेशचाही सोनेरी रंगाचा पेहराव लक्ष वेधून घेणारा आहे.

विशेष म्हणजे जानकीसाठी खास मोत्याचं मंगळसूत्रही डिझाईन करण्यात आलय. तर दुसरीकडे ऋषिकेशने जानकीच्या नावाचं अगदी मंगळसूत्रासारखं दिसणारं ब्रेसलेट घातलंय. दोघांचा पेहराव आणि दागिने लक्ष वेधून घेणारे आहेत. या लग्नाचा थाट लक्षात घेऊन प्रत्येक गोष्टींकडे विशेष लक्ष देण्यात आलय. त्यामुळेच पेहरावही हटके करण्याचा प्रयत्न दिसतोय.

विवाहसोहळ्यातल्या या लूकविषयी सांगताना जानकी म्हणजेच अभिनेत्री रेश्मा शिंदे याविषयी म्हणते की, ‘गेल्या दहा-बारा दिवसांपासून मालिकेत लग्नाच्या या सीनची धावपळ सुरु आहे.आम्हा कलाकारांसोबतच सगळ्या तंत्रज्ञ मंडळींची देखिल कसरत सुरु आहे. प्रत्येकाच्याच पेहरावाकडे विशेष लक्ष दिलं जात आहे. पारंपरिक लूक असल्यामुळे सीनसाठी तयार व्हायला दोन अडीच तास लागतात. आमचा लूक डिझाईन करणाऱ्या प्रत्येकाचच कौतुक. जानकीच्या साड्यांना प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. मला खात्री आहे लग्नातला लूकही प्रेक्षकांना आवडेल. मालिकेचं कथानक दिवसेंदिवस उत्कंठावर्धक होतंय."

Star Pravah Serial New Twist
Colors Serial Off Air: 'बिग बॉस मराठी ५' येणार पण कलर्सवरील दोन लोकप्रिय मालिका घेणार निरोप; कलाकारांनी शेअर केल्या पोस्ट

या मालिकेच्या निमित्ताने अभिनेत्री रेश्मा शिंदे आणि सुमीत पुसावळे ही जोडी पहिल्यांदाच एकत्र पाहायला मिळतेय.'रंग माझा वेगळा' या मालिकेतून दिपाच्या भूमिकेत लोकप्रिय झालेली रेश्मा शिंदे या मालिकेतून जानकीच्या हटके भूमिकेत लक्ष वेधून घेतेय. तर बाळूमामांच्या भूमिकेत दिसणारा सुमीत या मालिकेत ऋषिकेशच्या भूमिकेत मनं जिंकतोय. अल्पावधीतच या जोडीला प्रेक्षकांची पसंती मिळाली. त्यातच हा विवाहसोहळा देखील प्रेक्षकांची मनं जिंकणार असच चित्र दिसतय.

Star Pravah Serial New Twist
Aboli: अबोली आणि अंकुशच्या आयुष्यात येणार नवा ट्विस्ट; 'हा' अभिनेता करणार मालिकेत एन्ट्री

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.