Janvi Kapoor latest Update: अभिनेत्री जान्हवी कपूरला अन्नातून विषबाधा झाल्यामुळे तिला एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तेथे तिच्यावर उपचार सुरू आहेत.
ती रुग्णालयात दाखल झाल्यामुळे तिचे चाहते चिंता व्यक्त करीत आहेत. मात्र लवकरच ती घरी परतणार असल्याचे तिच्या वडिलांनी सांगितले
सध्या जान्हवी कपूर तिच्या उलझ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन्स ती करीत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. परंतु अचानक जान्हवी कपूरला रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. तिला अन्नातून विषबाधा झाली असल्याचे सांगण्यात येत आहे.
याबाबतीत बोनी कपूर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, की एच. एन. रुग्णालयात जान्हवीला दाखल करण्यात आले आहे. डाॅक्टर तिच्यावर उपचार करीत आहेत. घाबरण्याचे काही कारण नाही. आता तिची तब्येत ठीक आहे. उद्या किंवा परवा तिला रुग्णालयातून घरी सोडण्यात येईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.