Javed Akhtar : "स्त्रीने बूट चाटणे..." अ‍ॅनिमल सिनेमावर जावेद यांनी पुन्हा केली टीका ; दिग्दर्शकाबद्दल बोलले..

Javed Akhtar talks about Animal movie : ज्येष्ठ गीतकार, लेखक जावेद अख्तर यांनी अ‍ॅनिमल सिनेमावर टीका केली.
Javed Akhtar : "स्त्रीने बूट चाटणे..." अ‍ॅनिमल सिनेमावर जावेद यांनी पुन्हा केली टीका ; दिग्दर्शकाबद्दल बोलले..
Updated on

बॉलिवूडमधील ज्येष्ठ गीतकार आणि लेखक जावेद अख्तर त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांच्या परखड मतांमुळे त्यांनी अनेक वाद ओढवून घेतले आहेत. ज्याप्रमाणे त्यांची गाणी गाजतात त्याचप्रमाणे त्यांचे वादही चर्चेत राहहत. नुकत्याच एका मुलाखतीत त्यांनी अ‍ॅनिमल सिनेमा आणि अँग्री यंग मॅन ही संकल्पना यावर भाष्य केलं.

वि आर युवा या चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत अँग्री यंग मॅन या संकल्पनेवर भाष्य करताना त्यांनी अ‍ॅनिमल सिनेमावर सडकून टीका केली. ते म्हणाले,"एखादी व्यक्तिरेखा कोणताही उद्देश नसताना रागात आहे अशी दाखवली, तर तिचे रूपांतर व्यंगचित्रात होते आणि ‘अ‍ॅनिमल’सारखा चित्रपट निर्माण होतो. मी आणि सलीम खानने १९७० च्या दशकात अनेक चित्रपटांतील नायकांच्या भूमिका या ‘अँग्री यंग मॅन’साठी लिहिल्या आहेत. मात्र, ते नायक त्यावेळेच्या व्यवस्थांविरुद्ध लढा द्यायचे, त्यांना त्याविषयी राग असायचा. व्यवस्थेविरुद्ध तरुणांमध्ये राग असणे ही ‘अँग्री यंग मॅन’ची संकल्पना असायची. त्यावेळी बेरोजगारीचा प्रश्न होता. शासन मोठ्या प्रमाणात फक्त वचनं देत आहे आणि वास्तवात त्याचा अवलंब करीत नाही, हे तरुणाई बघत असायची आणि त्यामुळे यावर सरकारला प्रश्न विचारत आहेत असं या सिनेमात दाखवलं जायचं."

अ‍ॅनिमल सिनेमाविषयी पुढे बोलताना ते म्हणाले,"अ‍ॅनिमल हा सिनेमा मी पहिला नाही. पण त्या बूट चाटण्याच्या सीनविषयी मी वाचले आहे, लोकांकडून ऐकलं आहे. पण स्त्रीने बूट चाटणे किंवा तिच्या कानाखाली मारणे हे चुकीचं आहे. नशिबाने तो बूट चाटण्याचा सीन कापला आहे. पण मी तो सिनेमा पाहिला नाही."

Javed Akhtar : "स्त्रीने बूट चाटणे..." अ‍ॅनिमल सिनेमावर जावेद यांनी पुन्हा केली टीका ; दिग्दर्शकाबद्दल बोलले..
Sana Javed Video : पाकिस्तानच्या लोकांच्या मनात अजुनही 'सानियाच', भर स्टेडियममध्ये शोएबची तिसरी बायको सना ट्रोल! काय आहे कारण?

दरम्यान, जावेद अख्तर यांनी हे कबूल केले की, सलीम-जावेद लिखित चित्रपट कधीही स्त्रीप्रधान नव्हते. पण त्यांनी कायमच स्त्रियांचा आदर ठेवलाय. त्यांच्या सिनेमातील अभिनेत्री या खंबीर होत्या.  त्यांना स्वत:ची मतं असायची. त्यांनी आपल्या पतीला कधीही देवासारखं वागवलं नाही.

या आधीही जावेद साहेबांनी या सिनेमावर टीका केली आहे. त्यावरून बराच वाद झाला आहे.

Javed Akhtar : "स्त्रीने बूट चाटणे..." अ‍ॅनिमल सिनेमावर जावेद यांनी पुन्हा केली टीका ; दिग्दर्शकाबद्दल बोलले..
Uorfi Javed : खरंच टक्कल केलं? उर्फीच्या फोटो मागील सत्य नेटकऱ्यांनी केलं उघड

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com