Entertainment News : सोनी सब टेलिव्हिजनवरील 'तारक मेहता का उलटा चष्मा' ही मालिका पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या मालिकेत सोनू भिडेची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री पलक सिंधवानीला निर्मात्यांनी कायदेशीर नोटीस पाठवली आहे.तर तिनेही या नोटिसीला उत्तर देत निर्मात्यांवर मानसिक त्रास, शोषण आणि धमक्या दिल्याचे आरोप केले आहेत.