Kalki 2898 AD Trailer: सुरु झालंय नवं युद्ध... प्रभासच्या कल्की 2898 एडीचा ट्रेलर रिलीज, काय आहे खास?

ट्रेलरमध्ये प्रभाससोबतच अमिताभ बच्चन, दीपिका पदुकोण आणि दिशा पटाणी यांसारख्या कलाकरांची झलक बघायला मिळत आहे.
सुरु झालंय नवं युद्ध... प्रभासच्या कल्की 2898 एडीचा ट्रेलर रिलीज, काय आहे खास?
Kalki 2898 AD Trailersakal

Kalki 2898 AD Trailer: प्रभासच्या (Prabhas) 'कल्की 2898 एडी' (Kalki 2898 AD Trailer) या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. अशातच या चित्रपटाचा ट्रेलर आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या ट्रेलरमध्ये प्रभाससोबतच अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan), दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि दिशा पटानी (Disha Patani) यांसारख्या कलाकरांची झलक बघायला मिळत आहे. हा ट्रेलर सध्या चाहत्यांची मनं जिंकतोय.

'कल्की 2898 एडी' या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये जबरदस्त अॅक्शन सीन्स आणि VFX दिसत आहेत. या ट्रेलरमध्ये काही विज्ञान संबंधित गोष्टी देखील दाखवल्या जातील. भैरव नावाच्या एका व्यक्तीवर या चित्रपटाची स्टोरी लाइन आधारित आहे. प्रभास ही भूमिका साकारत आहे.

पाहा ट्रेलर

चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दिसत आहे की, यात हिंदू धर्मग्रंथ 'महाभारत' मधूनही काही महत्त्वाच्या गोष्टी घेण्यात आल्या आहेत. यात 'अश्वत्थामा' हा विषय महत्त्वाचा असून अमिताभ बच्चन हे पात्र साकारत आहेत.

कल्की 2898 एडी या चित्रपटाचे दिग्दर्शन नाग अश्विन यांनी केले आहे. चित्रपटाची कथा देखील नाग अश्विन यांनीच लिहिली आहे, ही कथा त्यांनी 2019 मध्ये लिहायला सुरुवात केली होती.

सुरु झालंय नवं युद्ध... प्रभासच्या कल्की 2898 एडीचा ट्रेलर रिलीज, काय आहे खास?
Kalki 2898 AD: प्रतीक्षा संपली! प्रभासच्या 'कल्की' ची रिलीज डेट जाहीर; नव्या पोस्टरने वेधलं लक्ष

अश्विन हे राष्ट्रीय पुरस्कार विजेता असून त्याला अनेकदा हा सन्मान देण्यात आला आहे. आता अशा दिग्दर्शकाने इतकी वर्षे कथेवर काम केले आहे, त्यामुळे प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबद्दल उत्सुकता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com