Bollywood Entertainment News : इमर्जन्सी सिनेमाची निर्माती, मुख्य अभिनेत्री दिग्दर्शक कंगना रनौतने सीबीएफसीच्या रिव्हायझिंग कमिटीने सिनेमात सुचवलेल्या कट्सना सहमती दिल्याचं तिच्या वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयाला कळवलं. सीबीएफसीचं प्रतिनिधित्व करणारे अॅडव्होकेट अभिनव चंद्रचूड यांनीही सदर माहिती न्यायमूर्ती बीपी कुलाबावाला आणि फिरदोश पूनीवाला खंडपीठासमोर सादर करत निवेदन सादर केलं.