अभिनेत्री कंगना रनौतने तिच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर फिल्म इंडस्ट्रीला खडेबोल सुनावले आहेत. त्याबरोबरच तिच्या इमर्जन्सी सिनेमाचं प्रोमोशनही केलं आहे. विशेष म्हणजे या थप्पड प्रकरणाचा कांगावा करत कंगनाने एका दगडात दोन पक्षी मारण्याचा प्रयत्न केला आहे.
कंगनाने सोशल मीडियावर एक स्टोरी शेअर करत फिल्म इंडस्ट्रीला खडेबोल सुनावले. ती म्हणाली,"ऑल आईज ऑन राफा गॅंग जेव्हा तुम्ही दुसऱ्यावर झालेला दहशतवादी हल्ला साजरा करताय तेव्हा तयार राहा हा हल्ला तुमच्यावर किंवा तुमच्या मुलांवरही होऊ शकतो. " असं म्हणत तिने सेलिब्रिटीजवर टीकाही केली.
त्याबरोबरच तिने तिच्या आगामी सिनेमाबद्दल पोस्ट शेअर केली. ती म्हणते,"माझी आगामी फिल्म यावरच आधारित आहे जेव्हा एका वृद्ध महिलेला काही खलिस्तानी लोकांनी मारलं होतं. " असं म्हणत तिने तिच्या आगामी इमर्जन्सी सिनेमाचं प्रोमोशनही केलं आहे.
याबरोबरच मेजर गौरव आर्या यांनी ट्विट केलेल्या वक्तव्याचं तिने समर्थन केलं आहे. गौरव आर्या यांनी म्हंटलं कि,
याबरोबरच मेजर गौरव आर्या यांनी ट्विट केलेल्या वक्तव्याचं तिने समर्थन केलं आहे. गौरव आर्या यांनी म्हंटलं कि, कंगनावर हल्ला करणारी कुलविंदर कौर लवकरच राजकारणात येईल आणि कोणत्यातरी पार्टीचं समर्थन करताना दिसेल. ही पोस्ट कंगनाने शेअर करत त्यांना समर्थन दिलं आणि म्हणाली,"तिने हे पूर्ण खूप नियोजनपूर्वक केलं. त्यात तिची खलिस्तानी पद्धत दिसून आली. मी तिला ओलांडून जाण्याची वाट पाहत होती. जसं मी तिच्या जवळ आले आणि तिने माझ्या गालावर चापटी मारली. मी तिला विचारलं, कि तू हे का केलंस? त्यावर तिने माझ्याकडे दुर्लक्ष करत फोनच्या कॅमेऱ्यात बघितलं आणि ती शेतकऱ्यांविषयीच्या कायद्यांबद्दल, त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाबद्दल जोरजोरात बोलू लागली ज्याने सगळ्यांचं लक्ष वेधलं गेलं. मला वाटत कि ती लवकरच खलिस्तानी समर्थका जाऊन मिळेल ज्यांना आता पंजाबमध्ये सगळ्यात जास्त राजकीय सीट्स मिळाल्या आहेत. " या पोस्टमधून तिने काँग्रेसवर निशाणा साधण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसून आलंय.
सिनेइंडस्ट्रीवर निशाणा साधलेली तिची पोस्ट व्हायरल सगळीकडे होतेय पण त्या आधीही तिने एक पोस्ट शेअर केली जी तिने डिलीट केली. त्या पोस्ट मध्ये ती म्हणाली,"प्रिय फिल्म इंडस्ट्री, तुम्ही माझ्यावर एअरपोर्टवर जो हल्ला झाला तो एकतर साजरा करताय किंवा त्याबद्दल काहीच बोलायचं नाही असं तुम्ही ठरवलं आहे. पण लक्षात ठेवा तुम्ही किंवा तुमची मुलं जगात कुठेही रस्त्यावर निशस्त्र फिरत असाल आणि एखाद्या इस्रायली किंवा पॅलेस्टाईनने तुमच्यावर किंवा तुमच्या मुलावर हल्ला केला तेव्हाही मी तुमच्या हक्कांसाठी लढा देईन. "
कंगनाच्या या पोस्टवर अनेकांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या.
या प्रकरणाचा थेट संबंध कंगनाने खलिस्तानी समर्थक आणि काँग्रेसशी जोडल्याच दिसून येताय , यावर आता काँग्रेस पक्ष काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.