Kangana Ranaut: "तुमची आकलनशक्ती माझ्यापेक्षाही वाईट", पंतप्रधानांवरून ट्रोल करणाऱ्यांना कंगनाचे खडेबोल

Kangana Ranaut: कंगनाने एका मुलाखतीदरम्यान नेताजी सुभाषचंद्र बोस देशाचे पहिले पंतप्रधान होते असं वक्तव्य केलं.
 भारताच्या पहिल्या पंतप्रधानांवरुन ट्रोल झालेल्या कंगनाचं ट्विट
Kangana Ranautesakal
Updated on

Kangana Ranaut: नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) पुन्हा एकदा वादात अडकलीय. कंगनाने राजकारणात प्रवेश केला असून ती भाजपाकडून लोकसभेची निवडणूक लढतेय. ती तिच्या शहरातून मंडीमधून ही निवडणूक लढवतेय आणि भाजपासाठी जोरदार प्रचार करतेय. कंगनाने एका मुलाखतीदरम्यान नेताजी सुभाषचंद्र बोस (Subhash Chandra Bose) देशाचे पहिले पंतप्रधान होते असं वक्तव्य केलं. या वक्तव्यामुळे ती सोशल मीडियावर पुन्हा एकदा ट्रोल होत असतानाच कंगनाने तिच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं आहे.

एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ती ट्विट करत म्हणाली,"जे कोणी मला सोशल मीडियावर भारताच्या पहिल्या पंतप्रधानांबद्दल ज्ञान देण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांनी खाली दिलेला स्क्रिनशॉट वाचा, नवशिक्यांसाठी हे सामान्य ज्ञान आहे. जे कोणी हुशार लोक मला थोडं शिक्षण घेण्यास सांगत आहेत त्यांना माहित असावं कि मी 'इमर्जन्सी' नावाचा सिनेमा लिहिला आहे, दिग्दर्शित केला आहे आणि त्यात अभिनयही केला आहे , जो संपूर्ण नेहरू कुटूंबावर आधारित आहे. तर मला शिकवण्याचा प्रयत्न करू नका. मी तुमच्या आकलनक्षमतेच्या पलीकडचं काहीतरी बोललं असेल तर तुम्हाला वाटतं कि मला काही माहिती नाहीये. तर इथे हसं तुमचं झालंय आणि ते खूपच वाईट आहे.", असं म्हणत तिने एनडीटीव्ही या वृत्त वाहिनीच्या वेबपेजचा स्क्रिनशॉट जोडलाय ज्यात सुभाषचंद्र बोस यांनी स्वतःला पंतप्रधान म्हणून घोषित केलं आणि आझाद हिंद सेनेची स्थापना कशी केली याची माहिती देण्यात आली आहे.

 भारताच्या पहिल्या पंतप्रधानांवरुन ट्रोल झालेल्या कंगनाचं ट्विट
Kangana Ranaut: 'आपण लावलेला जावईशोध हा..'; सरदार वल्लभभाई पटेल यांच्याबाबत कंगानानं पोस्ट शेअर केल्यानंतर विश्वास पाटलांचं ट्वीट

कंगना नेमकं काय म्हणाली होती?

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान कंगनाची एक मुलाखत घेण्यात आली ज्यात तिने ती काँग्रेसचा तिरस्कार का करते याचं कारण सांगत होती. हेच सांगत असताना तिने स्वातंत्र्यसेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे तिने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. टाईम्स नाऊ या वृत्तसंस्थेने कंगनाची मुलाखत घेतली होती. यावेळी कंगनाने नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा उल्लेख भारताचे पहिले पंतप्रधान असा केला. उलट तिने,"मी उत्तर देण्याआधी हे सांगा कि जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा भारताचे पहिले पंतप्रधान नेताजी सुभाषचंद्र बोस कुठे गेले?" जेव्हा मुलाखतकाराने तिला तिची चूक लक्षात आणून दिली तेव्हा कंगना तिच्या उत्तरावर असून राहिली आणि स्वतःची चूक मान्य केली नाही. ती म्हणाली,"नेताजी सुभाषचंद्र बोस देशाचे पंतप्रधान का झाले नाहीत? ते कुठे गेले? त्यांना कसं गायब करण्यात आलं? त्यांचं विमान भारतात का येऊ दिलं नाही?" असे प्रश्न तिने विचारले.

सोशल मीडियावर जनतेने दिल्या प्रतिक्रिया

तिच्या संपूर्ण मुलाखतीतील हा भाग एक्स म्हणजेच ट्विटरवर व्हायरल झाला असून अनेकांनी तिला याबाबत ट्रोल केलं आहे. एकाने म्हंटलय,"तिच्या मते २०१४ ला आपला देश स्वतंत्र झाला. स्वतंत्र भारताचे नरेंद्र मोदी पहिले पंतप्रधान आहेत. सरदार पटेल यांना पंतप्रधान केलं गेलं नाही कारण त्यांना इंग्रजी बोलता यायचं नाही. असेच विनोद पुढे पाच वर्षं ऐकण्यासाठी मंडीतील जनतेने कंगनाला निवडून द्यावे." तर एकाने तिने अकलेचे तारे तोडलेत असंही म्हंटल.

या आधीही कंगनाने अशी वादग्रस्त विधान करत सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. कंगनाची वक्तव्यामुळे अनेकांनी तिच्यावर नाराजी व्यक्त केली आहे

 भारताच्या पहिल्या पंतप्रधानांवरुन ट्रोल झालेल्या कंगनाचं ट्विट
Kangana Ranaut: कंगनानं प्रचारासाठी कंबर कसली, मंडीत केला रोड शो, भाषणातून काँग्रेसवर हल्लाबोल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.