Kangana Ranaut: सुभाषचंद्र बोस देशाचे पंतप्रधान हवे होते! मोदी सूर्य अन् विरोधी नेते मेणबत्ती ; कंगना रणौत असं का म्हणाली?

Kangana Ranaut: लोकसभा निवडणुकीत भाजपने अभिनेत्री कंगना रणौतला हिमाचल प्रदेशातील मंडी येथून उमेदवारी दिली आहे. त्यामुळे कंगना चांगलीच चर्चेत आली आहे.
Kangana Ranaut
Kangana Ranautesakal
Updated on

Kangana Ranaut:

लोकसभा निवडणुकीत भाजपने अभिनेत्री कंगना रणौतला हिमाचल प्रदेशातील मंडी येथून उमेदवारी दिली आहे. त्यामुळे कंगना चांगलीच चर्चेत आली आहे. काँग्रेस नेत्यांनी कंगना रणौत रणौतविरोधात वाद्रग्रस्त विधान केलं होतं. त्यावर कंगनाने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. कंगनाने पंतप्रधान मोदी यांना सूर्य तर विरोधकांना मेणबत्ती म्हटले आहे.

काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर कंगना रणौत आणि मंडी यांच्यावर आक्षेपार्ह कमेंट करून मोठा राजकीय वाद निर्माण केला आहे. अभिनेत्री कंगना राणौत विरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केल्याबद्दल निवडणूक आयोगाने बुधवारी काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. (Latest Marathi News)

टाईम्स नाऊला दिलेल्या मुलाखतीत कंगना म्हणाली, "विरोधकांचे सर्व मोठे नेते करोडो रुपयांच्या भ्रष्टाचारात बुडलेले आहेत. ते सर्व एकाच ठिकाणी जमू शकत नाहीत. त्यांची तुलना पंतप्रधान नरेंद्र मोदींशी केली तर ते सूर्यासारखे चमकतील आणि विरोधक त्यांच्यासमोर मेणबत्तीही नाही."

याशिवाय कंगना राणौतनेआझाद हिंद फौजेचे संस्थापक आणि महान स्वातंत्र्यसेनानी सुभाषचंद्र बोस यांना देशाचे पहिले पंतप्रधान म्हटले आहे. कंगना म्हणाली, "ज्या व्यक्तीने आपले रक्त सांडून आपल्याला स्वातंत्र्य दिले. जर्मनीपासून जपानपर्यंतच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला. त्यांना या देशाचे पंतप्रधान का केले नाही? अखेर ते कुठे गायब झाले"

Kangana Ranaut
X Premium : इलॉन मस्कने दिली आनंदाची बातमी; आता 'एक्स'चे प्रीमियम प्लस फीचर्स मिळणार अगदी मोफत

कंगनाला भाजपकडून उमेदवारी जाहीर होताच तिचे जुने विधानेही व्हायरल होत आहेत. देशाला खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य २०१४ मध्ये मिळाले असं कंगना म्हणाली होती. त्यामुळे तिला मोठ्या प्रमाणात ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता.

यावर कंगना म्हणाली, लोक मला ट्रोल करु शकतात. मात्र अशा लोकांनी माझ्याशी येऊन बोलावे. त्यांनी मला सांगावे मी कसे चुकीची बोलले.

कंगना म्हणाली, "स्वातंत्र्य फक्त तुरुंगातून बाहेर येण्यापुरतेच मर्यादित आहे का? नाही, त्याने कोणतीही न्याय व्यवस्था निर्माण केली नाही. आम्हाला आमच्या विचारसरणीतून स्वातंत्र्य मिळालेले नाही. विचार करण्याचे स्वातंत्र्यही मिळाले नाही. आम्हाला स्वतःसाठी माणसे निवडण्याचे स्वातंत्र्य मिळाले नाही. आम्हाला धार्मिक स्वातंत्र्यही मिळाले नाही."

Kangana Ranaut
Shivsena UBT: पुरातत्व विभागाने केली उद्धव ठाकरेंची कोंडी! रात्री उशिरा दिली शिवनेरीवर हेलीकॉप्टर लॅन्डींगची परवानगी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.