Kangana Ranaut On Farm Laws : "मी लक्षात ठेवले पाहिजे की आता..."; कंगना रनौतचा कृषी कायद्याच्या मुद्द्यावर यूटर्न!

Kangana Ranaut Utern On Farm Law : कृषी कायदे परत आणावेत अशी मागणी केल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या खासदार कंगना रनौत यांनी यूटर्न घेतला आहे
kangana ranaut
kangana ranautsakal
Updated on

कृषी कायदे परत आणावेत अशी मागणी केल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या खासदार कंगना रणौत यांनी यूटर्न घेतला आहे. कंगनाने आपले वक्तव्य मागे घेत आसल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट केला आहे.

कंगना रनौत यांनी आपले वक्तव्य मागे घेत म्हठले की जर कोणाला निराश वाटले असेल तर मला त्याचे दुखः असेल. कंगना रनौत यांनी रद्द करण्यात आलेली तीन कृषी कायदे परत आणले पाहिजेत असे म्हटले होते, ज्यानंतर भाजपकडून याबद्दल हात वर करण्यात आले होते.

हिमाचल प्रदेशच्या मंडी लोकसभा मतदारसंघातून पहिल्यांदाच खासदार बनलेल्या कंगना रनौत यांनी एक व्हिडीओ जारी करत आपले शब्द मागे घेत असल्याचे म्हटले आहे. मागील काही दिवसांमध्ये मीडियाने मला कृषी कायद्यासंबंधी प्रश्न विचारले आणि मी असे सुचवले की शेतकऱ्यांनी कृषी कायदे वापस आणण्यासाठी पंतप्रधान मोदी यांच्याकडे मागणी केली पाहिजे. माझ्या या वक्तव्यामुळे अनेक लोक निराश झाले.

मला लक्षात ठेवले पाहिजे की मी आता भाजपची नेता आहे आणि विचार करून बोलले पाहिजे . जेव्हा कृषी कायदे सादर करण्यात आले तेव्हा आम्ही याचे समर्थन केले होते. मात्र संवेदनशीलता आणि सहानुभूतीपोटी पंतप्रधान मोदी यांनी कायदे रद्द केले. सर्व कार्यकर्त्यांचे कर्तव्य आहे की त्यांच्या शब्दांचा सन्मान केला जावा. मी हे लक्षात ठेवले पाहिजे की मी आता एक कलाकार नाही भाजपची कार्यकर्ता आहे. माझे विचार फक्त माझे नसले पाहिजेत. पक्षाची भूमिका असली पाहिजे. कंगना पुढे म्हणाल्या की जर त्यांचे शब्द आणि विचारांनी कोणाला निराशा केले असेल तर त्याचे मला दुखः असेल आणि त्या आपले शब्द मागे घेत आहेत.

kangana ranaut
Pimpri Chinchwad Crime : धक्कादायक! पिंपरी चिंचवडमध्ये ८५ वर्षीय वृद्धेवर लैंगिक अत्याचार, २३ वर्षीय नराधमाला अटक

कंगना रनौत या मंडी येथे कार्यकर्त्यांसोबत झालेल्या एका बैठकीनंतर मीडियाशी बोलत होत्या, तेव्हा त्यांनी कृषी कायद्यांबद्दल वक्तव्य केले होते. तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यानंतर काँग्रेससह विरोधी पक्षातील नेत्यांनी भाजपवर टीका सुरू केली. हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर असे वक्तव्य केल्याने भाजपला याचा फटका बसू शकते. त्यामुळे भारतीय जनता पक्षाने या विधानाशी भाजपचा काही संबंध नसल्याचे सांगितले. भाजप प्रवक्ते गौरव भाटिया यांनी मंगळवारी रात्री एक निवेदन जारी करत सांगितले की, कंगना यांनी जे काही सांगितेल ते त्यांचे वयक्तिक मत असू शकते, पक्षाचे नाही. कंगना यांना यापूर्वी देखील पक्षाने सांभाळून वक्तव्य करावेत याबद्दल इशारा दिला होता.

kangana ranaut
Kalyan: कल्याणात पुन्हा उफाळला शिंदे - भाजप वाद, बॅनर प्रकरणी दीपेश म्हात्रे पोलीस ठाण्यात हजर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.