Karan Johar: ज्याला 'मुव्ही माफिया' म्हणत हिणवलं, आज तोच घेतोय क्विनची बाजू; कंगनावरील हल्ल्यावर करणच्या प्रतिक्रियेनं वेधलं लक्ष

Karan Johar on Kangana Ranaut: काही दिवसांपूर्वी CISF च्या महिला जवानाने (Kulwinder Kaur CISF Constable) कंगनाच्या कानशि‍लात लगावली. या घटनेची सोशल मीडियावर बरीच चर्चा झाली.
ज्याला 'मुव्ही माफिया' म्हणत हिणवलं, आज तोच घेतोय क्विनची बाजू; कंगनावरील हल्ल्यावर करणच्या प्रतिक्रियेनं वेधलं लक्ष
Karan Joharsakal
Updated on

Karan Johar: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री कंगना रनौत (Kangan Ranaut) ही गेल्या काही दिवसांपूर्वी चर्चेत आहे. कंगनावर काही दिवसांपूर्वी हल्ला झाला. चंदीगड विमानतळावर कुलविंदर कौर नावाच्या CISF च्या महिला जवानाने (Kulwinder Kaur CISF Constable) कंगनाच्या कानशि‍लात लगावली. या घटनेची सोशल मीडियावर बरीच चर्चा झाली. या घटनेवर अनेक सेलिब्रिटींनी प्रतिक्रिया दिल्या. अशातच आता करण जोहरनं देखील एका कार्यक्रमात या घटनेवर प्रतिक्रिया दिली. त्याच्या प्रतिक्रियेनं अनेकांचे लक्ष वेधले.

काय म्हणाला करण जोहर?

करण जोहरनं ‘किल’ नावाच्या चित्रपटासाठी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेला हजेरी लावली. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना करणनं कंगनावर झालेल्या हल्ल्यावर प्रतिक्रिया दिली. करणला एका पत्रकारानं कंगनावर झालेल्या हल्ल्याबाबत प्रश्न विचारल्या. यावर करणनं प्रतिक्रिया दिली, "मी कोणत्याही शाब्दिक किंवा शारिरीक प्रकारच्या हिंसाचाराचे समर्थन करत नाही."

पाहा व्हिडीओ

कंगनानं करणला 'मुव्ही माफिया' म्हणतं हिणवलं होतं

कंगनानं काही वर्षांपूर्वी करणच्या कॉफी विथ करण या कार्यक्रमामध्ये हजेरी लावली. या कार्यक्रमामध्ये कंगनानं करणला बरंच ट्रोल केलं होतं. या कार्यक्रमात कंगना करणला म्हणाली होती, "जर माझी बायोपिक झाली तर तू नेपोटिझमला सपोर्ट करणाला, आऊट साडर्सबाबत असहिष्णू असणारा अशा मुव्ही माफियाच्या भूमिकेत असणार" तुला इंडस्ट्रीत कोण जास्त अॅटिट्युड दाखवतं? असा प्रश्न करणनं कॉफी विथ करण या कार्यक्रमामध्ये कंगनाला विचारला होता. या प्रश्नाचं उत्तर देताना कंगनानं करणचं नाव घेतलं होतं.

ज्याला 'मुव्ही माफिया' म्हणत हिणवलं, आज तोच घेतोय क्विनची बाजू; कंगनावरील हल्ल्यावर करणच्या प्रतिक्रियेनं वेधलं लक्ष
Kangana Ranaut: कंगनाला कानशि‍लात लगावणाऱ्या सीआयएसएफ जवान कुलविंदर कौर यांना नोकरी देणार 'हा' स्टार; पोस्टनं वेधलं लक्ष

कंगनानं काही दिवसांपूर्वी राजकारणात एन्ट्री केली आहे. कंगनानं हिमाचल प्रदेश येथील मंडीमधून लोकसभेची निवडणूक लढली. या निवडणुकीत तिचा विजय झाला आहे. कंगना आता राजकारणात प्रवेश केल्यानंतर बॉलिवूड सोडणार का? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.