कन्नड अभिनेता दर्शन याला वैद्यकीय उपचारांसाठी कर्नाटक हायकोर्टाने सहा आठवड्यांचा अंतरिम जामीन मंजूर केला आहे. पाय सुन्न पडल्याचे सांगत त्यावर सर्जरी करण्यासाठी अंतरिम जामीनासाठीची मागणी दर्शन याच्याकडून करण्यात आली होती. आता कोर्टाने ही मागणी मंजूर करत सहा आठवड्यांचा जामीन मंजूर केला आहे.