Chandu Champion : सिनेमाच्या ट्रेलरला मिळालेल्या प्रतिसादाने कार्तिक भारावला; "मी तुमच्यामुळे रात्रभर झोपलो नाही"

Chandu Champion trailer went viral : अभिनेता कार्तिक आर्यनची मुख्य भूमिका असलेल्या चंदू चॅम्पियन सिनेमाचा ट्रेलर सोशल मीडिया गाजवतोय.
Kartik Aaryan
Kartik AaryanEsakal
Updated on

अभिनेता कार्तिक आर्यनची मुख्य भूमिका असलेल्या 'चंदू चॅम्पियन' सिनेमाच्या ट्रेलरची चर्चा सगळीकडे आहे. एका खेळाडूची गोष्ट या सिनेमातून पाहायला मिळणार आहे. या सिनेमाला मिळणाऱ्या तुफान प्रतिसादाबद्दल कार्तिक आर्यनने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सगळ्यांचे आभार मानले.

ट्रेलरला आतापर्यंत 9.3 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत तर 2 लाख 34000हुन अधिक लाईक्स मिळाले आहेत.

"चंदू चॅम्पियन सिनेमाच्या ट्रेलरला तुम्ही दिलेल्या भरभरून प्रतिसादाबद्दल मी तुमचा कृतज्ञ आहे. जगाच्या सगळ्या कोपऱ्यातून मिळणाऱ्या प्रेमामुळे मला रात्रभर झोप लागली नाही. मी प्रत्येक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया वाचतोय. तुमचं प्रेम ही सुपरपॉवर आहे आणि तिचं मला रोज चॅम्पियन असल्याची भावना देते."

अशी पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत कार्तिकने सगळ्या प्रेक्षकांचे त्यांनी ट्रेलरला दिलेल्या प्रतिसादाबद्दल आभार मानले. सोबत त्याने ट्रेलर लाँच सोहळ्यातील काही खास क्षण शेअर केले.

कसा आहे सिनेमाचा ट्रेलर?

कार्तिक आर्यननं 'चंदू चॅम्पियन' या चित्रपटासाठी घेतलेल्या मेहनतीची या चित्रपटाच्या ट्रेलरमधून पाहायला मिळते. चित्रपटामध्ये मुरलीकांत पेटकर यांच्या जीवनातील विविध टप्पे दाखवण्यात आले आहे. त्यामुळे ट्रेलरमध्ये कार्तिक आर्यन हा विविध लूकमध्ये दिसतो.

ट्रेलरची सुरुवात विजयराज यांच्या आवाजानं होते, ज्यामध्ये ते मुरलीकांत पेटकरची कथा सांगतात. भारतीय सैन्याचा भाग असलेल्या मुरलीकांत पेटकर यांना युद्धादरम्यान 9 गोळ्या लागल्या होत्या. हे चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलं आहे. त्यांचा बालपणाबद्दल तसेच भारतीय सैन्यात भरती होण्यापासून ते ऑलिम्पिकपर्यंतचा प्रवास दाखवण्यात आला आहे.

फिटनेसवर घेतली मेहनत

'चंदू चॅम्पियन' या सिनेमासाठी कार्तिकने स्वतःच्या फिटनेसवर कमालीची मेहनत घेतली. त्यानेव वर्षभर साखर अजिबात खाल्ली नव्हती आणि त्याच्या खाण्याकडे तो अत्यंत कटाक्षाने लक्ष देत होता. या सिनेमासाठी वर्षभर कार्तिकने त्याच्या वर्क आऊटवर लक्ष केंद्रीत केलं होतं. त्याने दुसऱ्या कोणत्याही सिनेमाचं शूटिंग या काळात केलं नाही. तो एखाद्या रोबोट प्रमाणे काम करत होता असंही त्याने यादरम्यान शेअर केलं.

या सिनेमात कार्तिक सोबत विजयराज, राजपाल यादव, हेमांगी कवी, पलक लालवानी यांचीही मुख्य भूमिका आहे.

Related Stories

No stories found.