Chandu Champion : "कित्येकवेळा मला असहाय्य वाटलं"; स्ट्रगलविषयी बोलताना कार्तिक भावूक

Chandu Champion Trailer Launch : चंदू चॅम्पियन सिनेमाच्या ट्रेलर लाँचवेळी कार्तिक स्ट्रगलविषयी सांगताना भावूक झाला.
Kartik talks about chandu chamipon
Kartik talks about chandu chamiponEsakal
Updated on

कार्तिक आर्यनच्या आगामी चंदू चॅम्पियन सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला आणि या ट्रेलरला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळतोय. कार्तिकच्या अभिनयाचं आणि त्याने घेतलेल्या मेहनतीचं सोशल मीडियावर कौतुक होतंय.

कार्तिकच्या शहरात ग्वालियरमध्ये या सिनेमाचा ट्रेलर लाँच थाटात पार पडला. यावेळी कार्तिकने त्याला इंडस्ट्रीत सामना कराव्या लागलेल्या स्ट्रगलबद्दल भाष्य केलं.

ट्रेलर लाँचवेळी कार्तिकला त्याला त्याच्या सिनेइंडस्ट्रीतील प्रवासात कधी 'अपंग' झाल्यासारखं वाटलं आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी कार्तिकने उत्तर दिलं कि,"मला अपंग झाल्यासारखं वाटलं नव्हतं पण मला वाटतं कि असहाय्य हा शब्द जास्त योग्य ठरेल. कधीकधी असहाय्य वाटणं साहजिक आहे आणि हे सगळ्यांसोबत घडतं."

पुढे यावर बोलताना कार्तिक म्हणाला कि,"प्रत्येकाच्या आयुष्यात चढउतार येतात, प्रत्येकाच्या आयुष्यात स्वतःचा एक स्ट्रगलचा काळ असतो. तुम्ही जसं विचारलं कि मला माझ्या आयुष्यासतील कोणती गोष्ट बदलायला आवडेल तर मी सांगेन मला कोणतीही गोष्ट बदलायची नाही. मला जर संधी मिळाली तर मी माझा प्रवास असाच परत जगेन. मला काहीच बदलायचं नाहीये. "

Kartik talks about chandu chamipon
Chandu Champion : प्रतीक्षा संपली! 'या' दिवशी रिलीज होणार 'चंदू चॅम्पियन'चा ट्रेलर; चित्रपटातील 'त्या' सीनचं सिक्रेट कार्तिकने केलं उघड

"मला बऱ्याचदा असहाय्य वाटतं नंतर मी माझ्या आई-बाबांनी घेतलेल्या मेहनतीचा विचार करतो. मला वाटतं थोडंसं गमावल्याशिवाय तुम्ही काहीच मिळवू शकत नाही. प्रत्येक गोष्टीत वाईट अनुभव येतात पण तो आयुष्याचा भाग असतो." असंही कार्तिक म्हणाला.

'चंदू चॅम्पियन' या सिनेमासाठी कार्तिकने स्वतःच्या फिटनेसवर कमालीची मेहनत घेतली. त्यानेव वर्षभर साखर अजिबात खाल्ली नव्हती आणि त्याच्या खाण्याकडे तो अत्यंत कटाक्षाने लक्ष देत होता. या सिनेमासाठी वर्षभर कार्तिकने त्याच्या वर्क आऊटवर लक्ष केंद्रीत केलं होतं. त्याने दुसऱ्या कोणत्याही सिनेमाचं शूटिंग या काळात केलं नाही. तो एखाद्या रोबोट प्रमाणे काम करत होता असंही त्याने यादरम्यान शेअर केलं.

Kartik talks about chandu chamipon
Chandu Champion Trailer: मुरलीकांत पेटकर यांची गोष्ट; प्रत्येक फ्रेममध्ये दिसते कार्तिक आर्यनची मेहनत, कसा आहे 'चंदू चॅम्पियन'चा ट्रेलर?

पॅरालिम्पिक चॅम्पियन पद्मश्री मुरलीकांत पेटकर यांच्या आयुष्यावर हा सिनेमा आधारित आहे. 1965च्या भारत पाकिस्तान युद्धात मुरलीकांत गंभीर जखमी झाले होते. त्यांना 9 गोळ्या लागल्या होत्या. त्यानंतरही त्यांनी स्वतःच्या उणिवांवर मात करत पॅरालिम्पिक स्पर्धेचं गोल्ड मेडल मिळवलं.

या सिनेमात कार्तिक सोबत राजपाल यादव, हेमांगी कवी यांचीही मुख्य भूमिका आहे.

पहा ट्रेलर:

Related Stories

No stories found.