Katrina Kaif : फक्त अभिनेत्री नाही उद्योजिकाही आहे कतरिना कैफ; कोरोनामध्ये भंडारा जिल्ह्यासाठी उघडली होती कंपनीची तिजोरी..

Katrina Kaif Inspirational Journey : बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री असलेल्या कतरीना कैफने उद्योजिका म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलीये. जाणून घेऊया तिच्या या प्रवासाविषयी.
Katrina Kaif Brand Success Story
Katrina Kaif Brand Success StoryEsakal
Updated on

Katrina Kaif : बॉलिवूड आता कॉपोरेट जगातील एक महत्त्वाचा हिस्सा बनला आहे. फिल्म निर्मितीपासून ते बॉक्स ऑफिस कलेक्शनपर्यंतच्या प्रत्येक प्रक्रियेमध्ये व्यवसायिकतेची छाप दिसून येते. अगदी इंडस्ट्रीतील कलाकारही या पासून लांब राहिले नाहीयेत. अनेक कलाकारांनी फक्त अभिनयावरच त्यांचा चरितार्थ अवलंबून न ठेवता अनेक उद्योगांमध्ये गुंतवणूक केली आहे. पण बॉलिवूडमध्ये असेही काही कलाकार आहेत ज्यांनी स्वतःची यशस्वी उद्योजक म्हणून ओळख निर्माण केली. यातीलच एक म्हणजे कतरिना कैफ. आज १६ जुलैला कतरीनाचा वाढदिवस आहे त्यानिमित्ताने जाणून घेऊया तिच्या या प्रवासाविषयी.

आज अनेक बॉलिवूड कलाकार कपडे, स्किनकेअर,फिटनेस सारख्या अनेक श्रेणींमध्ये स्वतःचा व्यवसाय सुरु करताना दिसत आहे. त्यांच्याप्रमाणेच कॅटरिनानेही काही वर्षांपूर्वी स्वतःचा के ब्युटी हा ब्रँड लाँच केला. एकीकडे बॉलिवूड सेलिब्रिटीजचे हे लक्झरी ब्रॅण्ड्स अयशस्वी ठरत असताना कॅटरिनाच्या के ब्युटीने मात्र सर्वसामान्यांच मन जिंकलं. काय आहेत या ब्रॅण्डच्या यशाची कारण ?

वर्ण समानतेवर दिला भर

कतरिनाने तिचा के ब्युटी हा ब्रँड लाँच करताना फक्त गोरेपणा हेच सौंदर्य हा पुरस्कार न करता भारतीय त्वचेमध्ये आढळणारी विविधता, त्यातील सौंदर्य यांचा पुरस्कार केला. तिने तिच्या या ब्रँड अंतर्गत प्रत्येक स्किन टोनला साजेसे दिसतील असे प्रॉड्क्टस तयार केले आणि मुख्य करून त्यांचं तसं मार्केटिंग केलं. तिने जन्मजात सौंदर्याला स्वीकारण्याबाबत केलेली पीआर कॅम्पेन यशस्वी झाली आणि याचा प्रभाव तिच्या ब्रँडवर दिसून आला.

उत्कृष्ट प्रॉडक्ट

कतरिनाने मार्केटिंगबरोबरच तिचा सगळा भर उत्तम प्रॉडक्ट निर्माण करण्यावर दिला. याचा परिणाम असा झाला कि किफायतशीर किंमतीमध्ये सामान्य स्त्री वर्गाला उत्तम दर्जाचे मेकअप आणि स्किन केअर प्रॉडक्टस उपलब्ध झाले. तिला स्वतःला उत्तम मेकअपची जाण असल्याने आणि तिची ही आवड असल्याने प्रॉडक्टचा दर्जा उत्कृष्ट असावा यावर तिने जास्त भर दिला.

ऑनलाईन शॉपबरोबर भागीदारी

कतरिनाने नायका ब्युटीच्या फाल्गुनी नायर यांच्याबरोबर व्यावसायिक भागीदारी केली. याचा फायदा तिला असा झाला कि, तिचं प्रॉडक्ट जास्तीत जास्त सामान्य लोकांपर्यंत लवकरात लवकर पोहोचलं आणि किंमती इतर लक्झरी ब्रँडच्या तुलनेत कमी असल्याने त्याची विक्रीही उत्तम झाली.

कोरोना काळात केलेली मदत

२०२० साली लॉकडाऊन दरम्यान कतरिनाने 'दे हात फाऊंडेशन'बरोबर भागीदारी करत भंडारा जिल्ह्यातील रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांना मदत केली. तिने त्यासाठी के ब्युटीच्या माध्यमातून सढळ दान करत तिने रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांना दैनंदिन जीवनात लागणाऱ्या रेशन आणि स्वच्छतेसंबंधीच्या गोष्टी पुरवल्या. तिच्या या सोशल ऍक्टिव्हीटीचा फायदाही तिच्या कंपनीला कोरोना काळात टिकाव धरण्यासाठी झाला.

Katrina Kaif Brand Success Story
Katrina & Alia working together : बंद केलेल्या प्रोजेक्टची पुन्हा सुरुवात; कतरीना, प्रियांका आणि आलिया दिसणार पहिल्यांदाच एकत्र

कतरीनाचा के ब्युटी ब्रॅण्डचं सध्याचं मूल्य २२४ करोड असल्याचं म्हंटलं जातंय. २०१९ मध्ये सुरु झालेल्या या ब्रॅण्डने अवघ्या चार वर्षांमध्ये १.५ बिलियन रुपयांची मार्जिन मूल्याची वाढ केली आहे. एकूणच, एकीकडे इतर बॉलिवूड कलाकारांचे ब्रॅण्ड्स अयशस्वी ठरत असताना कतरीनाने उद्योजिका म्हणून निर्माण केलेली स्वतःची ओळख नक्कीच कौतुकास्पद आहे.

Katrina Kaif Brand Success Story
Vicky & Katrina : कतरीना-विकीचा नवा व्हिडीओ व्हायरल ; नेटकऱ्यांनी पापाराझींची केली कानउघाडणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.