अमिताभ बच्चन चित्रपटांसोबतच टीव्हीवर 'कौन बनेगा करोडपती' या शो मध्ये देखील काम करतात. कित्येक वर्षांपासून आपण त्यांना या शोमध्ये पाहात आलो आहोत. आता पुन्हा एकदा बिग बी या शो चे नवीन पर्व घेऊन येत आहेत. या सीझनमध्ये अनेक गोष्टी नव्या असणार आहेत, याची झलक प्रोमोमध्ये देखील पाहायला मिळाली. नुकतेच या शोच्या निर्मात्यांनी लेटेस्ट प्रोमो व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामुळे चाहत्यांची एक्साइटमेंट आणखीनच वाढली आहे.
'कौन बनेगा करोडपती सीझन 16' पुढील महिन्यात 12 ऑगस्ट रोजी प्रीमियर होणार आहे. शोच्या या सीझनची टॅगलाईन आहे 'जिंदगी है, हर मोड़ पर सवाल पूछेगी, जवाब तो देना होगा.' ' 'कौन बनेगा करोडपती' अनेक दिवसांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आला आहे. या शोला खूप मजबूत फॅन फॉलोइंग आहे. सर्व वयोगटातील लोकांना हा शो पाहायला आवडतो. पण तुम्ही कधी या शो मध्ये सहभागी होण्याचा विचार कधी केला आहे का? या शोमध्ये बिग बींसमोरील हॉट सीटपर्यंत कसे पोहोचू शकू हे जाणून घेण्यासाठीही अनेकजण उत्सुक आहेत. आज आपण या शोमध्ये सहभागी होण्यासाठीची संपूर्ण नोंदणी प्रक्रिया जाणून घेणार आहोत…
'कौन बनेगा करोडपती 16' मध्ये सहभागी होण्यासाठी, प्रथम तुम्हाला रजिस्ट्रेशन करावे लागेल.
यासाठी तुम्हाला तुमच्या फोनमध्ये Sony Liv ॲप डाउनलोड करावे लागेल.
आता तुम्हाला KBC रजिस्ट्रेशनवर जाऊन विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील.
प्रश्नोत्तराची उत्तरे दिल्यानंतर जी काही प्रोसेस दिली जाईल, ती पूर्ण करावी लागेल.
यानंतर, रजिस्ट्रेशन कन्फर्म झाल्याचे तुमच्या स्क्रीनवर दिसेल.
तुम्ही 'कौन बनेगा करोडपती 16' साठी एसएमएसद्वारेही रजिस्ट्रेशन करू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईल फोनच्या मेसेज बॉक्समध्ये जाऊन KBC लिहावे लागेल. त्यानंतर स्पेस देऊन रजिस्ट्रेशन करताना विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तराचा पर्याय द्यावा लागेल. यानंतर, तुम्हाला तुमचे वय आणि लिंग लिहून 509093 या क्रमांकावर पाठवावे लागेल. याशिवाय http://www.sonyliv.com या वेबसाइटवर जाऊन तुम्ही ऑनलाइन नोंदणी करू शकता .
यानंतर तुमचे रजिस्ट्रेशन पूर्ण होईल आणि तुमचे उत्तर बरोबर असेल तर तुमची निवड केली जाईल. त्यानंतर येथे पोहोचल्यानंतरही 11 जणांची निवड केली जाईल. या 11 लोकांना सर्वात फास्टेस्ट फिंगर फर्स्ट प्रश्न विचारला जाईल, जो कमीत कमी वेळेत अचूक उत्तर देऊ शकेल त्याला बिग बींच्या समोर हॉट सीटवर बसण्याची संधी मिळेल.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.