Kiran Mane Share Post: अभिनेते किरण माने (Kiran Mane) यांनी काही महिन्यांपूर्वी राजकारणात एन्ट्री केली. त्यांच्या या एन्ट्रीची बरीच चर्चा देखील झाली. किरण माने हे सोशल मीडियाच्या माध्यमातून विविध विषयांवर भाष्य करत असतात. अशातच किरण माने यांनी राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) व्हायरल पत्राबाबत आणि सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी त्यांच्यावर केलेल्या टीकेबद्दल पोस्ट शेअर केली आहे.
किरण माने यांनी सुषमा अंधारे आणि राज ठाकरे यांचा फोटो शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, "महिला कुस्तीगीरांनी ज्याच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केलेले आहेत त्या ब्रिजभूषणवर कारवाई करा. अशा आशयाचे पत्र राज ठाकरे यांनी थेट पंतप्रधानांना पाठवले आहे असे राज ठाकरेंनी जाहीर केले होते. एक वर्षापूर्वी, 31 मे रोजी सोशल मिडीयावर ते पत्र पोस्ट केले गेले. ते पत्र प्रचंड व्हायरल झाले होते.ब्रिजभूषणला आम्ही मुंबईत पाऊल ठेवू देणार नाही. असा इशाराही दिला होता.हा स्टंट असणार असा संशय काहीजणांना आला. ईडीच्या भितीने घाबरलेले राजजी हे धाडस करणार नाहीत अशी बर्याचजणांना खात्री होती. शेवटी माहितीच्या अधिकारात एकाने याविषयी अर्ज करून विचारणा केली. पंतप्रधान कार्यालयाकडून असे उत्तर आले की,"राज ठाकरे यांच्याकडून असे कुठलेही पत्र पंतप्रधान कार्यालयाला आलेले नाही."
पुढे त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं, "केवढी मोठी चालबाजी होती ही! सुषमा अंधारेताईंनी काल अणुशक्तीनगर येथे हा पर्दाफाश केला तेव्हा मी तिथे हजर होतो. उपस्थित प्रचंड जनसमुदायातून "शेSSSम शेSSSSम" असा खुप मोठा आवाज येऊ लागला. लोकांना मनापासून या फसवणुकीचे वाईट वाटलेले दिसले. राजकीय नेत्यांनी कायम एक लक्षात ठेवावे. एकवेळ तुम्ही निष्क्रिय असा, जनता खपवून घेईल. पण खोट्या भूलथापा देऊन जनतेच्या भावनांशी खेळू नका. आधीच या देशातले सर्वसामान्य नोकरदार, छोटे व्यावसायिक, गोरगरीब मजूर, शेतकरी, कष्टकरी आणि महिला नाडले गेलेले आहेत. जगणं हराम झालंय... त्यात तुम्ही असा थापेबाजी, स्टंटबाजीचा खेळ करू नका. बास."
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.