"राहुल-प्रियांका या दोघांनी आईच्या चेहर्‍यावरचं हरवलेलं हसू परत आणलं"; किरण मानेंनी शेअर केलेल्या व्हिडीओनं वेधलं लक्ष
Kiran Manesakal

Kiran Mane: "राहुल-प्रियांका या दोघांनी आईच्या चेहर्‍यावरचं हरवलेलं हसू परत आणलं"; किरण मानेंनी शेअर केलेल्या व्हिडीओनं वेधलं लक्ष

Sonia Gandhi: किरण माने यांनी नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सोनिया गांधी (Sonia Gandhi) या स्माईल करताना दिसत आहेत.
Published on

Sonia Gandhi: अभिनेते किरण माने (Kiran Mane) हे सोशल मीडियावर विविध पोस्ट शेअर करतात. अशातच किरण माने यांनी नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्या चेहऱ्यावर हसू दिसत आहे. किरण माने यांनी सोनिया गांधी यांच्या व्हिडीओला खास कॅप्शन दिलं आहे.

किरण मानेंनी शेअर केला व्हिडीओ

किरण माने यांनी सोनिया गांधी यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये एका कार्यक्रमात सोनिया गांधी या स्माईल करताना दिसत आहेत. या व्हिडीओला किरण माने यांनी कॅप्शन दिलं, "हिंदू-हिंदू करत बसल्यामुळं कुणी हिंदू होत नाही. हिंदू धर्मातली सगळ्यात पहिली शिकवण ही आहे की 'आईबाप हे देवाहुन श्रेष्ठ असतात.' पुंडलीकानं आईबापासाठी विठोबाला विटेवर उभं केलं... रामानं पित्याला दिलेल्या वचनासाठी वनवास भोगला... खरा हिंदु आईबापाला वार्‍यावर सोडत नाही."

पुढे त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं, "गांधी परिवाराला धर्मावरून भक्तपिलावळीनं खुप अर्वाच्य ट्रोलिंग केलं. 'गांधी परिवार हिंदू नाही' अशी चिखलफेक भक्ताडांनी केली. पण आज राहुल आणि प्रियांका या दोन लेकरांनी हिमतीनं लढुन, संघर्ष करुन, आपल्या आईच्या चेहर्‍यावरचं हरवलेलं हसू परत आणलं ! या आईचं हे निर्मळ, नितळ हास्य साक्षात् कौसल्या मातेच्या चेहर्‍यावर आलेल्या निरागस हास्यासमान आहे."

"आईबापाला कुटुंबाला वार्‍यावर सोडून फायद्यासाठी धर्माचा ठेका घेतलेल्यांपेक्षा या लेकरांनी पाळलेला धर्म आम्हाला जास्त जवळचा आहे, हे संपूर्ण देशानं दाखवून दिलं.लब्यू राहुल. तुझ्यासारखे कर्तृत्ववान सुपुत्र भारताला लाभोत.", असंही किरण माने यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं.

"राहुल-प्रियांका या दोघांनी आईच्या चेहर्‍यावरचं हरवलेलं हसू परत आणलं"; किरण मानेंनी शेअर केलेल्या व्हिडीओनं वेधलं लक्ष
Kiran Mane: "कन्याकुमारीहून समुद्र मार्गे 'डंकी' वाटेने..."; लोकसभा निवडणुकीच्या निकालादरम्यान किरण मानेंच्या पोस्टनं वेधलं लक्ष

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.