Vishalgad Controversy : "असले निष्क्रीय, भ्रष्टाचारी लोक सत्तेत बसवले..."; विशाळगड प्रकरणाबाबत अभिनेते किरण मानेंचे सरकारला खडेबोल

Kiran Mane's post on Vishalgad Controversy : अभिनेते किरण माने यांनी विशाळगडावरील अतिक्रमण आणि गजापूरला झालेली दंगल यावर भाष्य करत सरकारवर टीका केली.
Kiran Mane's Post
Kiran Mane's PostEsakal
Updated on

Kiran Mane's Post : विशाळगडावरील अतिक्रमण आणि गजापूर येथे झालेली दगडफेक यावरून सध्या सगळीकडे तणावपूर्ण वातावरण आहे. सोशल मीडियावर या प्रकरणाबाबत बरीच चर्चा होतेय. याबाबत अभिनेते किरण मानेंनीही सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांचं मत व्यक्त केलं आणि सरकारवर टीका केली.

किरण मानेंची पोस्ट

किरण माने यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत या प्रकरणावर टीका केली. तो म्हणाला," "विशाळगड अतिक्रमणावर लिहा की." अशी कमेन्ट गेल्या पंधरा दिवसांत अनेक अनोळखी अकाऊंटवरनं येऊ लागली. सगळी प्रोफाईल लाॅक. सहसा आयटी सेलच्या गटारातली घाण पसरवायला अशी डुक्करपिलावळ नेमलेली असते. बर्‍याचजणांच्या पोस्टवर मी अशा कमेन्ट बघितल्या. अतिक्रमण काय कालपरवाचं नाही. बर्‍याच वर्षांपासूनचं आहे. मग नेमकं आत्ताच का यावर असं रान पेटवलं जातंय??? मी उत्तर द्यायचो की "ही अतिक्रमणं हटवणं हे सरकारचं काम आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री झोपलेयतय का? असले निष्क्रीय, भ्रष्टाचारी लोक सत्तेत बसवले की हेच होणार."
अहो, शेंबडं पोरगंबी सांगेल की हे सगळं विधानसभा निवडणुक डोळ्यापुढं ठेवून चाललेलं आहे. सत्ताधार्‍यांकडे कुठला मुद्दाच हातात नाही. सगळे उद्योग गुजरातला गेलेत. बेरोजगारीचा कहर झालाय. पेपर फुटताहेत. रस्त्यांची दुर्दशा झालीय. शेतकरी आत्महत्या तिपटीने वाढल्यात. मग यांच्या हातात एकच मुद्दा रहातो - 'हिंदु-मुस्लीम' ! बरं विशाळगडाच्या पायथ्याशी आणि गडावरचं हे जे अतिक्रमण आहे, ते सगळ्या जातीधर्माच्या लोकांनी केलंय.
आता गंमत अशी आहे की परवा जी दंगल घडवून आणली गेली, ती या दोन्ही ठिकाणी झाली नाही ! ती झाली गजापूरला !! अतिक्रमणाशी कसलाही संबंध नसलेल्या तिथल्या मुस्लीम समाजाला विनाकारण टारगेट करून प्रचंड प्रमाणात नासधूस करण्यात आली. याचाच अर्थ ही दंगल घडवणारे कुणी शिवभक्त नव्हते, कुणाच्या तरी आदेशावरून आलेले दंगलखोर होते. त्यांचा हेतू गडावरचे अतिक्रमण वगैरे नसून काहीतरी वेगळाच होता.
असो. एवढे होऊनही महाराष्ट्र शांत आहे. कुठेही हिंदु-मुस्लीम तेढ निर्माण झालेली नाही. कुठेही याचे हिंसक पडसाद नाहीत. पुन्हा एकदा सिद्ध झाले की हा शिव-शाहु-फुले-आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. अहो, छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या हयातीत विशाळगडावरच्या दर्ग्याला हात लावला नाही. शिवरायांच्या विचारांचा खरा वारसदार असलेला अस्सल मराठमोळा मावळा कधीच असल्या धर्मद्वेषाला बळी पडणार नाही !
विशाळगडावरील अतिक्रमणाबाबतीत महाराष्ट्र सरकारने त्वरित पावलं उचलावीत. कुठल्याही नागरिकाच्या जीवाची हानी न होता आणि कसलीही धार्मिक तेढ निर्माण न होता हे काम झाले पाहिजे.
भावाबहिणींनो, सरकारच्या मनात असेल तर हे काम सहजसोपे आहे. आज महागाई, बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या, महिला सुरक्षा, रस्त्यांची दुरावस्था, टोलनाक्यांवरची लूट, स्पर्धा परीक्षांमध्ये होणारे घोटाळे, ड्रग्ज रॅकेट अशा अनेक भयानक गोष्टींचा विळखा महाराष्ट्राला पडलेला आहे. आपण त्यावरून लक्ष हटवायचे नाही.
जय शिवराय...जय भीम !"

त्यांच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत किरण मानेंच्या म्हणण्याला सहमती दर्शवली. अनेकांनी किरण याच्या पोस्टवर कमेंट करत समर्थन केलं. सोशल मीडियावर त्यांची ही पोस्ट चर्चेत आहे. "कुठल्याही परिस्तितीमध्ये आपण जातीपतीच्या राजकारणामध्ये पडले नाही पाहिजे
जी मंडळी हे सर्व करतात त्यांना त्याचा राजकीय फायदा हवा असतो मग तो कोणत्याही पक्षाचा असू दे. गेल्या १० वर्षात महाराष्ट्र किती मागे गेलाय ह्याच्याशी ह्याना काहीही घेणेदेने नाहीये…
आजच्या युवापीढीचे जर सोशल मीडियाचा वापर बघितला तर कळेल की आपण अख्खं तरुणाईची वाट लागतेय" अशी कमेंट एका युजरने केली आहे.

या आधीही किरण यांनी राममंदिरात होणाऱ्या गळतीबाबत, दिल्ली येथे झालेल्या दुर्घटनेबाबत त्यांनी भाष्य केलं होतं.

Kiran Mane's Post
Kiran Mane : 'त्यांच्या एंट्रीला बाया तिरस्काराने धुसफुसायच्या' ; किरण मानेंची निळू भाऊंच्या आठवणीत खास पोस्ट, म्हणाले,"या अभिनेत्याने.."

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.