Kota Factory 3: 'पंचायत-3' नंतर आता 'कोटा फॅक्ट्री-3' येणार प्रेक्षकांच्या भेटीला; पण रिलीज डेट जाणून घेण्यासाठी गणिताचं उत्तर द्यावं लागेल

Kota Factory 3 Jitendra Kumar: जितेंद्रनं प्रेक्षकांना एक गणित सोडवायला दिलं आहे. या गणितात 'कोटा फॅक्ट्री-3' या वेब सीरिजची रिलीज डेट लपलेली आहे.
'पंचायत-3' नंतर आता 'कोटा फॅक्ट्री-3' येणार प्रेक्षकांच्या भेटीला; पण रिलीज डेट जाणून घेण्यासाठी गणिताचं उत्तर द्यावं लागेल
Kota Factory 3SAKAL

Kota Factory 3: सध्या अभिनेता जितेंद्र कुमारची (Jitendra Kumar) पंचायत-3 (Panchayat 3) ही वेब सीरिज ट्रेंड होत आहे. ही वेब सीरिज अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर (Amazon Prime Video) पहिल्या क्रमांकावर ट्रेंड होत आहेय अशातच आता जितेंद्रच्या 'कोटा फॅक्ट्री-3' या वेब सीरिजची देखील घोषणा करण्यात आली आहे. या वेब सीरिजबाबत जितेंद्रनं नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये जितेंद्रनं प्रेक्षकांना एक गणित सोडवायला दिलं आहे. या गणितात 'कोटा फॅक्ट्री-3' या वेब सीरिजची रिलीज डेट लपलेली आहे.

कधी रिलीज होणार कोटा फॅक्ट्री-3?

नेटफ्लिक्सच्या सोशल मीडियावर अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये जितेंद्र हा फळ्यावर एक गणित लिहिताना दिसत आहे. हे गणित सोडवल्यानंतर प्रेक्षकांना कोटा फॅक्ट्री-3 या वेब सीरिजची रिलीज डेट कळणार आहे. या व्हिडीओला कॅप्शन देण्यात आलं, "सरप्राइज टेस्ट. कोटा फॅक्टरी: सीझन 3 जूनमध्ये रिलीज होणार आहे." पंचायत-3 नंतर आता जितेंद्र कुमारच्या 'कोटा फॅक्टरी- सीझन 3' या वेब सीरिजची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.

पाहा व्हिडीओ:

गणिताचं उत्तर काय?

जितू भैय्यानं प्रेक्षकांना सोडवायला दिलेल्या गणिताचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न सध्या नेटकरी करत आहेत. 'कोटा फॅक्टरी सीझन 3' ही वेब सीरिज 20 जूनला रिलीज होईल, असा अंदाज प्रेक्षक सध्या लावत आहेत.

'पंचायत-3' नंतर आता 'कोटा फॅक्ट्री-3' येणार प्रेक्षकांच्या भेटीला; पण रिलीज डेट जाणून घेण्यासाठी गणिताचं उत्तर द्यावं लागेल
Amruta Khanvilkar: मराठमोळी अमृता खानविलकर झळकणार हिंदी वेब सीरिजमध्ये; '36 डे ' चा ट्रेलर पाहिलात का?

'कोटा फॅक्टरी सीझन 3' या वेब सीरिजचा पहिला सीझन 2020 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या वेब सीरिजला प्रेक्षकांची पसंती मिळाली. त्यानंतर या वेब सीरिजचा दुसरा सीझन रिलीज झाला. दुसऱ्या सीझनला देखील प्रेक्षकांची पसंती मिळाली. या वेब सीरिजमुळे जितेंद्र कुमारला प्रेक्षक जीतू भैया या नावानं ओळखू लागले. जितेंद्रनं या वेब सीरिजमध्ये शिक्षकाची भूमिका साकारली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com