Kshitee Jog: "आई-वडिलांनी वेगळं राहण्याचा निर्णय घेतल्यावर मला आनंद झाला"; क्षिती झाली व्यक्त

Kshitee Jog: क्षिती अठरा वर्षाची असताना तिचे आई-वडील उज्ज्वला (Ujwala Jog) आणि अनंत जोग (Anant Jog) वेगळे झाले.
"आई-वडिलांनी वेगळं राहण्याचा निर्णय घेतल्यावर मला आनंद झाला"; क्षिती झाली व्यक्त
Kshitee Jogesakal
Updated on

Kshitee Jog: मराठी सिनेविश्वातील एक आघाडीची अभिनेत्री आणि निर्माती क्षिती जोग (Kshitee Jog) तिच्या ठाम आणि बेधडक विचारांसाठीही ओळखली जाते. प्रत्येक विषयावरील तिचे स्पष्ट विचार अनेकांना आकर्षित करतात. नुकतंच क्षितीने एका मुलाखतीत तिच्या आई-वडिलांच्या वेगळं राहण्याविषयीचं मत व्यक्त केलं. क्षिती अठरा वर्षाची असताना तिचे आई-वडील उज्ज्वला (Ujwala Jog) आणि अनंत जोग (Anant Jog) वेगळे झाले. ते वेगळे राहू लागले याचा मला खूप आनंद झाला असं ती यावेळी म्हणाली.

क्षितीने नुकतीच आरपार या युट्युब चॅनेलच्या 'वुमन कि बात' या कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी तिला तिच्या आई-वडील जेव्हा वेगळे झाले तेव्हा लोकं प्रश्न करतात त्यावेळी तुझं काय म्हणणं असायचं असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी क्षिती म्हणाली,"मी अठरा वर्षांची होते तेव्हा माझे आई-वडील वेगळे झाले आणि याचा मला आनंद झाला होता. त्यांची सततची भांडणं ऐकून मी वैतागले होते. त्यांना जितका एकत्र राहण्याचा त्रास होत होता तितकंच मला सतत त्यांची भांडणं बघून त्रास होत होता. जेव्हा आम्ही एकत्र राहायचो तेव्हा ते सतत भांडायचे. ते एकमेकांसोबत खुश नव्हते आणि या सगळ्या वातावरणामुळे मी खुश नव्हते. पण जेव्हा त्यांनी वेगळं राहण्याचा निर्णय घेतला तेव्हा मला आनंद झाला. आम्ही तिघेही वेगळं राहू लागलो आणि आम्ही आता सुखी आहोत. आम्ही अजूनही एकत्र भेटतो, एकत्र जेवायला बाहेर जातो, माझ्या घरी बाबा जेवायला येणार असतील तर आई सुद्धा येते. कधी कधी बाबा त्यांना आईच्या हातचं बनवलेलं जेवण खायचं असेल तर परस्पर तिच्या घरी जातात. पण मी जरी वेगळी राहत असले तरीही माझ्या आई-वडिलांना कायम माहित असायचं मी कुठे आहे आणि मी काय करतेय. जर ते जबाबदार पालक आहेत तर मी ही जबाबदार मुलगी आहे. मी कधीच त्या वयात मी केलेल्या चुकांचं खापर माझ्या आई-वडिलांच्या वेगळं राहण्यावर फोडलं नाही. मला ते पटत नाही. आपल्या चुकांसाठी आपण स्वतः जबाबदार असतो असं मला वाटतं.मी एकटी राहायचे तेव्हा लोकं सिंपथी द्यायला यायचे, पण मला ते आवडायचं नाही कारण मी एकटं राहू शकत होते. आई सोबत माझं आजही पूर्वी सारखंच भांडण होत. वडिलांसोबतही माझं भांडण होतं. आमचं नातं अजूनही तितकंच चांगलं आहे."

क्षितीने अभिनेता, दिग्दर्शक हेमंत ढोमेसोबत लग्न केलं आहे. त्या दोघांनी मिळून झिम्मा, झिम्मा 2, सनी या सिनेमाची निर्मिती केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.