Laapataa Ladies Oscar: 'लापता लेडीज' निघाला ऑस्करला, भारताकडून सर्वोत्कृष्ट विदेशी चित्रपट म्हणून निवड

Laapataa Ladies Oscar Kiran Rao: हा 2025 च्या ऑस्करसाठी सर्वोत्कृष्ट विदेशी चित्रपट श्रेणीत 'लापता लेडीज'ची भारताकडून निवड करण्यात आली आहे.
किरण रावचा 'लापता लेडीज' ओटीटीवर झाला रिलीज; कोणत्या प्लॅटफॉर्मवर पाहू शकता चित्रपट? जाणून घ्या...
Laapataa Ladies OTT Releaseesakal
Updated on

किरण राव दिग्दर्शित 'लापता लेडीज' हा चित्रपट यंदाच्या प्रतिष्ठेच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाने हा चित्रपट ऑस्करसाठी भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून पाठवला आहे. याला फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाने दुजोरा दिला आहे.

अलीकडेच किरण रावने आपला 'लापता लेडीज' हा चित्रपट ऑस्करसाठी पाठवावा अशी इच्छा व्यक्त केली होती.

पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना किरण राव म्हणाली होती की, 'लपता लेडीज' हा चित्रपट ऑस्करच्या शर्यतीत सहभागी व्हावा, इच्छा आहे." आणि आज फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाने हा चित्रपट ऑस्करसाठी अधिकृत प्रवेश म्हणून पाठवल्याची पुष्टी केली आहे.

वृत्तसंस्था पीटीआयच्या मते, भारतीय फिल्म फेडरेशनने सोमवारी जाहीर केले की ऑस्कर 2025 साठी भारताकडून 'लापता लेडीज' अधिकृतरित्या पाठवला जाणार आहे.

रणबीर कपूरचा 'ॲनिमल', मल्याळम चित्रपट 'अट्टम' आणि पायल कपाडियाचा 'ऑल वी इमॅजिन ॲड लाइट' यासह 29 चित्रपटांच्या यादीतून 'लापता लेडीज'ची निवड करण्यात आली आहे.

आसामी दिग्दर्शक जाह्नू बरुआ यांच्या अध्यक्षतेखालील 13 सदस्यीय निवड समितीने एकमताने आमिर खान आणि राव यांनी निर्मित 'लापता लेडीज'चा अकादमी पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट श्रेणीत समावेश करण्याचा निर्णय घेतला.

'महाराजा', 'कल्की 2898 एडी', 'हनुमान', 'स्वातंत्र्य वीर सावरकर' आणि 'आर्टीकल 370' या तमिळ चित्रपटांचाही या यादीत समावेश होता. मात्र, यामध्ये 'लापता लेडीज'ने बाजी मारली.

किरण रावचा 'लापता लेडीज' ओटीटीवर झाला रिलीज; कोणत्या प्लॅटफॉर्मवर पाहू शकता चित्रपट? जाणून घ्या...
Coldplay मध्ये नेमके कोण-कोण आहेत? त्यांची इतकी क्रेझ का? 'ही' आहेत त्यांची सर्वाधिक गाजलेली गाणी

'लापता लेडीज' हा चित्रपट दोन भारतीय नववधूंच्या कथेवर आधारित आहे. चित्रपटाची कथा हृदयाला भिडणारी आहे. आमिर खान प्रॉडक्शन आणि किरण रावच्या किंडलिंग प्रॉडक्शनच्या बॅनरखाली याची निर्मिती केली आहे.

हा चित्रपट याच वर्षी मार्चमध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. त्यात नितांशी गोयल, प्रतिभा रंता, छाया कदम, स्पर्श श्रीवास्तव आणि अभय दुबे या कलाकारांचा समावेश आहे. त्यात अभिनेता रवी किशन पोलिसाच्या भूमिकेत दिसला होता. महिला सक्षमीकरणाबाबत समाजात जागरूकता निर्माण करणारा हा चित्रपट आहे.

किरण रावचा 'लापता लेडीज' ओटीटीवर झाला रिलीज; कोणत्या प्लॅटफॉर्मवर पाहू शकता चित्रपट? जाणून घ्या...
Aarya Jadhao : "निक्की जिंकली तर...", बिग बॉस मराठीबद्दल आर्याने स्पष्टच सांगितलं

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.