Chhaya Kadam Family: अभिनेत्री छाया कदम यांनी सातासमुद्रापार मराठी संस्कृती जपत भारतीय चित्रपटसृष्टीसाठी अभिमानास्पद अशी कामगीरी केलीय. कान्स चित्रपट महोत्सवात त्यांचा रेड कार्पेटवरील वावर असेल, त्यांच्या चित्रपटाला मिळालेला सन्मान या सगळ्याच गोष्टी चर्चेत राहिल्या. ‘ऑल वी इमॅजीन ऐज लाईट’ या त्यांच्या चित्रपटाला कान्स महोत्सवात ग्रँड प्रिक्स पुरस्कार मिळाला, शिवाय या चित्रपटाच्या स्क्रिनिंगलाही टाळ्यांचा कडकडाट करुन या चित्रपटाच्या टीमचं कौतुक करण्यात आलं. त्यानंतर सोशल मिडीयावरही छाया कदम मोठ्या प्रमाणात प्रकाशझोतात आल्या.
नुकतीच त्यांनी सकाळला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. अभिनय क्षेत्रात काम करत असताता कान्स आणि ‘लापता लेडिज’ चित्रपटाच्या भूमिकेनंतर त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय. छाया कदम यांच्यासाठी हा आनंदाचा क्षण आहे. असं असलं तरी खासगी आयुष्यात छाया कदम यांना दु:खाला सामोरं जावं लागलय. आई-वडिलांचं छत्र हरपलेल्या छाया कदम यांना या आनंदाच्या क्षणात आई-वडिलांची उणीव भासते म्हणूनच सध्या लहान भाऊ आणि मित्रमंडळी यांच्यावर त्या जीव लावतात.
सकाळला दिलेल्या मुलाखतीत छाया कदम सांगतात की, “आई असायला पाहिजे होती, बाबा असायला हवे होते हे कायमच वाटत राहतं. माझ्या बाबांनी कधीच मला मुलीसारखं वागवलं नाही, ते कायम मला मुलासारखच समजायचे. ते म्हणायचे की ह्यो माझो मुलगो.. माझ्या दोन्ही भावांचा माझ्यावर खूप जीव होता. आज मी पहिल्यांदा हे सांगतेय की, मी दर वेळी असं म्हणत असते की आई- बाबा पाहिजे होते. पण मला आत्ता असं वाटतं की ते पाहिजे होते हे ठिक आहे पण जे आहेत ना त्यांना जपता आलं पाहिजे, त्यांना आनंद देता आला पाहिजे. आता माझा लहान भाऊ आहे, माझी वहिनी आहे, भाची आहे, माझा मित्रपरिवार आहे. हे माझं मोठं कुटुंब आहे. आता मला त्यांच्यासाठी जगायचय.”
खासगी आयुष्यात अनेक उतार चढाव आलेले असतानाही खचून न जाता छाया कदम या क्षेत्रात स्वत:ला कार्यरत ठेवतात. पुढे त्या म्हणतात की “मला खूप वेळा असहाय्य वाटलंय, पण हे आपल्याच हातात असतं. तेच किती घेऊन बसायचं. एक दार बंद झालं की दुसरं दार उघडतंच आणि जर नाही उघडलं तर त्या दारावर लाथ मारायची आणि ते दार उघडायचं”
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.