Marathi Entertainment News : पती-पत्नीचे नाते हे एखाद्या नाजूक धाग्यासारखे असते. कधी कधी या नात्यामध्ये भांडण-तंटा उद््भवतो.. कधी रुसवेफुगवे तयार होतात तर कधी समज-गैरसमज निर्माण होतात. त्यावेळी या नात्याला खूप जपावे लागते. अशा वेळी दोघांनीही आपल्या नात्यातील गोडवा जपायचा असतो आणि संसाराच्या वेलीवर आनंदाचा मळा कसा फुलेल याचा विचार करायचा असतो. पाणीपुऱी हा चित्रपटामध्ये पती-पत्नीच्या याच आंबट गोड नात्याची कथा मांडण्यात आली आहे.