Salman Khan: ज्या पिस्तुलाने अतिकची हत्या त्याच पिस्तुलाने सलमानला मारायचे होतं? लॉरेन्स बिश्नोईबद्दल पोलिसांचा मोठा खुलासा

Salman Khan: अभिनेता प्रसिद्ध अभिनेता सलमान खानवर झालेल्या हल्ल्याबाबत मुंबई पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे. मुंबई पोलिसांनी सांगितले की, लॉरेन्स बिश्नोई टोळी सलमान खानच्या हत्येचा कट रचत होती.
Lawrence Bishnoi Wanted To Kill Salman khan With The Same Pistol With Which Atiq Ahmed and his brother Was Murdered big revelation of mumbai police
Lawrence Bishnoi Wanted To Kill Salman khan With The Same Pistol With Which Atiq Ahmed and his brother Was Murdered big revelation of mumbai police Esakal

अभिनेता प्रसिद्ध अभिनेता सलमान खानवर झालेल्या हल्ल्याबाबत मुंबई पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे. मुंबई पोलिसांनी सांगितले की, लॉरेन्स बिश्नोई टोळी सलमान खानच्या हत्येचा कट रचत होती. यासाठी लॉरेन्स टोळी तुर्कस्तानमध्ये निर्मित झिगाना पिस्तुल वापरू शकले असते.

झिगाना पिस्तुलनेच माफिया डॉन अतीक अहमदची आणि त्याचा भाऊ अशरफ यांची हत्या करण्यात आली होती. अतीक आणि अशरफ यांची हत्या एप्रिल २०२३ मध्ये झाली होती. मुंबई पोलिसांनी याबाबत माहिती देताना सांगितलं की, याच पिस्तुलीने पंजाबी गायक सिध्दु मूसेवालीची हत्या करण्यात आली होती.

Lawrence Bishnoi Wanted To Kill Salman khan With The Same Pistol With Which Atiq Ahmed and his brother Was Murdered big revelation of mumbai police
Anant-Radhika pre-wedding : रिहानानंतर आता कॅटी पेरीचा जलवा; अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगमध्ये केला धमाकेदार परफॉर्मन्स, किती घेतलं मानधन?

सलमान खानच्या घरावर ठेवली होती नजर

मुंबई पोलिसांच्या पनवेल झोन २ च्या पोलीस उपअधीक्षक विवेक पानसरे यांनी सांगितले की, 24 एप्रिल रोजी चार जणांना अटक करण्यात आली होती आणि त्यांच्याकडून सलमानच्या हत्येच्या नियोजनाबाबत काही माहिती मिळाली आहे. त्याने सांगितले की, पोलिसांनी चिकना शूटरला बेंगळुरू येथून अटक केली आहे. या लोकांनी काही लोकांसोबत सलमान खानच्या घराची आणि फार्म हाऊसची रेकी केली होती.

Lawrence Bishnoi Wanted To Kill Salman khan With The Same Pistol With Which Atiq Ahmed and his brother Was Murdered big revelation of mumbai police
Pune Porsche Accident : "फक्त लिहला मी निबंध... पिझ्झाचा झाला प्रबंध!" पोर्शे अपघातावर RJ मलिष्काने बनवलं तिखटजाळ रॅप साँग

रेकी करणारे बिश्नोई गँगशी संबधित

सलमान खानच्या घराची रेकी करणारे आरोपी हे लॉरेंन्स बिश्नोई गँगशी संबधित होते. ते सलमान खानच्या गाडीवर हल्ला करण्याच्या तयारीत होते. या प्रकरणात पोलिस १० ते १२ जणांचा तपास करत आहेत. त्यातबरोबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गँगस्टर आनंदपाल याची मुलगी ही या आरोपींच्या संपर्कात होती. पोलिसांनी माहिती देताना सांगितले की, अटक केलेले सर्व आरोपींबाबतचे सर्व पुरावे आहेत. ते सर्वजण अभिनेता सलमान खानच्या हत्येचा कट रचत होते. या सर्व प्रकरणात अजय कश्यप यांचं देखील नाव समोर आलं आहे, या प्रकरणात ते महत्त्वाची भूमिका बजावत असल्याची माहिती समोर येत आहे.

Lawrence Bishnoi Wanted To Kill Salman khan With The Same Pistol With Which Atiq Ahmed and his brother Was Murdered big revelation of mumbai police
Salman Khan : कोण आहे संपत नेहरा ? सलमानच्या घरापासून काहीच अंतरावर राहत होता 'हा' आरोपी

पोलिसांनी या प्रकरणाच पाकिस्तानचा काही संबध आहे का हे देखील तपासले आहे. अजय कश्यप हा शस्त्रास्त्रांच्या तस्करीचे काम करतो आणि त्याच्यावर शस्त्रांची जबाबदारी सोपवण्यात आली होती. आरोपींनी श्रीलंकेला पळून जाण्याची योजनाही आखली होती. लॉरेन्सने सलमान खानला अनेकदा जीवे मारण्याची धमकी दिली आहे. मुंबई पोलिसांनी सलमानला Y श्रेणीची सुरक्षा दिली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com