Lok Sabha Elections 2024: 1 जून रोजी लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा शेवटचा टप्पा पार पडला. 4 जून रोजी लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होणार आहे. या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. अशातच लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे थेट प्रक्षेपण महाराष्ट्रातील चित्रपटगृहांमध्ये दाखवले जाणार आहे. महाराष्ट्रातील मुंबई, नाशिक, पुणे, नागपूर अशा मोठ्या शहरांमधील थिएटर्समध्ये लोकसभा निवडणुकीचे थेट प्रक्षेपण होणार आहे.
मंगळवारी लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होणार आहे. हे निकाल आता सिनेमागृहांमध्ये प्रेक्षकांना पाहता येणार आहेत. PayTm नुसार, सायन, मुंबईतील MovieMax सेन्ससोबतच इटरनिटी मॉल ठाणे, SM5 कल्याण, वंडर मॉल ठाणे आणि कांजूरमार्गसह परिसरातील विविध सिनेमागृहांमध्ये निवडणुकीचे निकाल दाखवले जातील. मुंबई व्यतिरिक्त, पुण्यातील लोक मुव्हीमॅक्स अॅमेनोरा थिएटरमध्ये, नाशिकचे लोक द झोनमध्ये आणि नागपूरचे लोक मुव्हीमॅक्स इटर्निटी नगर येथे निवडणूक निकाल पाहू शकतील.
सकाळी 9 ते सायंकाळी 6 यावेळेत थिएटर्समध्ये लोकसभा निवडणुकीचे निकाल दाखले जातील. निकाल पाहण्यासाठी तिकिटांची किंमत 99 रुपयांपासून 300 रुपयांपर्यंत असेल. हे तिकीट तुम्ही बुक माय शो या अॅपवरुन बुक करु शकता. या उपक्रमाचं अनेकजण कौतुक करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.