Chirag Paswan: कंगणाचा फ्लॉप हीरो बनला एनडीएचा सुपरस्टार खासदार, मोदींसाठी ठरणार लकी ?

Chirag Paswan Journey form Bollywood to politics: चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती या पक्षाने यंदा जागांवर निवडणूक लढवली. या पाचही जागा त्यांनी जिंकल्या आहेत.
कंगणाचा फ्लॉप हीरो बनला एनडीएचा सुपरस्टार खासदार, मोदींसाठी ठरणार लकी ?
Chirag Paswan,Kangana Ranautsakal
Updated on

Chirag Paswan: 2024 च्या लोकसभा निवडणुकीचे निकाल 4 जून रोजी आले आहेत. या निवडणुकीमध्ये अनेक सेलिब्रिटींची प्रतिष्ठा पणाला लागली होती. अनेक कलाकार यंदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. हेमा मालिनी आणि अरुण गोविल यांनी यंदा लोकसभा निवडणुकीत बाजी मारली . तर हिमाचल प्रदेशातील मंडी येथून कंगना रणौतने (Kangana Ranaut) विजय मिळवला. चिराग पासवान (Chirag Paswan) यांच्या लोक जनशक्ती (Lok Janshakti Party) या पक्षाने यंदा जागांवर निवडणूक लढवली. या पाचही जागा त्यांनी जिंकल्या आहेत. चिराग पासवान हे स्वत: देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. बिहारमधील हाजीपूरमधून त्यांनी निवडणूक लढवली होती, जिथे त्यांना दणदणीत विजय मिळाला होता. कंगना रणौत आणि चिराग पासवान यांनी 13 वर्षांपूर्वी स्क्रिन शेअर केली होती. त्यांच्या 13 वर्षांपूर्वीच्या चित्रपटाची सध्या चर्चा होत आहे.

पहिलाच चित्रपट फ्लॉप

कंगना रणौत आणि चिराग पासवान यांचा 13 वर्षांपूर्वी 'मिले ना मिले हम' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. चिराग पासवान यांनी या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं. तन्वीर खान यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. कंगना आणि चिराग पासवास यांच्याशिवाय नीरू बाजवा, सागरिका घाटगे यांनी देखील या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारली. अशातच चिराग पासवान यांचा हा पहिला चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला.

कंगणाचा फ्लॉप हीरो बनला एनडीएचा सुपरस्टार खासदार, मोदींसाठी ठरणार लकी ?
Kangana Ranaut : ज्या आजींमुळे कंगनाला कानशिलात बसली त्या मोहिंदर कौर नेमक्या कोण? काय आहे प्रकरण?

पहिलाच चित्रपट फ्लॉप ठरल्यानंतर चिराग यांनी राजकारणामध्ये एन्ट्री केली. त्यांनी 2014 ची लोकसभा निवडणूक बिहारमधील जमुईमधून लढवली. या निवडणुकीत ते विजयी ठरले. चिराग पासवान यांची बॉलिवूडमधील एन्ट्री जरी फ्लॉप ठरली तरी राजकारणात ते हिट ठरले.

 चिराग पासवान
miley naa miley humsakal

एनडीएचे सुपरस्टार खासदार

यंदाच्या लोकसभेच्या निवडणुकीत चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती या पक्षाने पाच जागांवर निवडणूक लढवली होती, ज्यात हाजीपूर, जमुई, खगरिया, समस्तीपूर आणि वैशाली यांचा समावेश आहे, या पाचही जागांवर त्यांनी विजय मिळला.

चिराग पासवान यांची 6% दलित आणि पासवान व्होट बँक या निवडणुकीतही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिल्याचे बघायला मिळाले.

लोकसभा निवडणुकीत भाजपला स्वबळावर बहुमत मिळाले नसतानाही चिराग पासवान यांनी आज तकशी खास बातचीत करताना सांगितलं की, मी नरेंद्र मोदींसाठी हनुमान असून मी फक्त एनडीएसोबत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.