Madgaon Express: बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातल्यानंतर ओटीटीवर रिलीज झाला 'मडगाव एक्सप्रेस'; कोणत्या प्लॅटफॉर्मवर पाहू शकता चित्रपट? जाणून घ्या...

Movie OTT Release: 'मडगाव एक्सप्रेस' (Madgaon Express) हा चित्रपट ओटीटीवर रिलीज झाला आहे.
बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातल्यानंतर ओटीटीवर रिलीज झाला 'मडगाव एक्सप्रेस'
Madgaon Express sakal
Updated on

Madgaon Express OTT Release: विविध चित्रपट आणि वेब सीरिज ओटीटीवर (OTT) रिलीज होत असतात. अशातच आता बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातलेला 'मडगाव एक्सप्रेस' (Madgaon Express) हा चित्रपट ओटीटीवर रिलीज झाला आहे. त्यामुळे आता ज्यांनी हा चित्रपट थिएटरमध्ये पाहिला नाही ते आता हा चित्रपट घरबसल्या पाहू शकतात. कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट रिलीज होणार आहे? जाणून घेऊयात...

'या' ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला ‘मडगाव एक्सप्रेस’

कुणाल खेमूने ‘मडगाव एक्सप्रेस’ या चित्रपटातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले. या चित्रपटाचे अनेकांनी कौतुक केले. 'मडगाव एक्सप्रेस' हा चित्रपट आता ओटीटीवर प्रदर्शित रिलीज झाला आहे. कॉमेडी आणि सस्पेंस असणारा हा चित्रपट प्राइम व्हिडीओ या ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे. गुरुवारी प्राइम व्हिडिओच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन या चित्रपटाच्या ओटीटी रिलीजची घोषणा करण्यात आली. इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले होते, "the Goa trip finally left the gc!"

‘मडगाव एक्सप्रेस’ ची स्टार कास्ट

कुणाल खेमू दिग्दर्शित ‘मडगाव एक्सप्रेस’ या चित्रपटाची निर्मिती रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर यांनी केली आहे. डोडो (दिव्येंदु), पिंकू (प्रतीक) आणि आयुष (अविनाश) या तिघांच्या ट्रीपची कथा ‘मडगाव एक्सप्रेस’ या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. नोरा फतेही, उपेंद्र लिमये आणि छाया कदम यांनी देखील या चित्रपटात काम केलं आहे. या चित्रपटातील भन्नाट कॉमेडी, चित्रपटाचे उत्कृष्ट लेखन आणि कलाकारांच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं. या चित्रपटानं जगभरात 44.5 कोटी रुपये कमावले.

बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातल्यानंतर ओटीटीवर रिलीज झाला 'मडगाव एक्सप्रेस'
Kangana Ranaut: कंगनाच्या 'इमर्जन्सी'ची रिलीज डेट पुन्हा पुढे ढकलली, टीम म्हणाली, "आमची क्वीन सध्या देशाप्रती..."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.