निपचित पडलेल्या लक्ष्याला पाहून एकच वाक्य म्हणालेले महेश कोठारे; सांगितला रात्री तीन वाजताचा प्रसंग

Mahesh Kothare Emotional On Laxmikant Berde Death: महेश कोठारे यांनी एका मुलाखतीत जेव्हा लक्ष्मीकांत बेर्डे यांचं निधन झालं त्या दिवशीचा प्रसंग सांगितला आहे.
mahesh kothare
mahesh kothare with laxmikant berdesakal
Updated on

Laxmikant Berde: मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांच्या मैत्रीची अनेक उदाहरणं देता येतील. त्यातील खास जोडी म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे आणि महेश कोठारे. त्यांच्या मैत्रीचे दाखले आजही प्रेक्षक देताना दिसतात. त्यांच्या जोडीने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. त्यांचे सिनेमे आजही प्रेक्षक आवडीने पाहतात. मात्र ही जोडी तुटली ती लक्ष्मीकांत यांच्या मृत्यूनंतर. सगळ्यांच्या लाडक्या लक्ष्याचं निधन झालं आणि सगळ्यांनाच मोठा धक्का बसला. जेव्हा २००४ साली त्यांचं निधन झालं तेव्हा महेश यांची अवस्था अतिशय वाईट झाली होती. एका मुलाखतीत त्यांनी त्या रात्री नेमकं काय घडलेलं हे सांगितलं आहे.

महेश यांनी नुकतीच लोकमत फिल्मीला मुलाखत दिली. या मुलाखतीत बोलताना ते म्हणाले, 'जेव्हा मला कळलं की लक्ष्या आपल्यात नाही आहे, तेव्हा माझं सगळं जग हलल होतं. मला रात्री ३ वाजता रवींद्र बेर्डेचा फोन आला आणि तो मला म्हणाला, आपला लक्ष्या गेला रे... तेव्हा माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी, डॅडी, निलिमा आम्ही सगळे लक्ष्याच्या घरी गेलो. लक्ष्या तिथे असा निर्जीव पडला होता. मी जेव्हा त्याला पाहिलं तेव्हा माझ्या तोंडात एकच वाक्य आलं. व्हॉट हॅव यू डन लक्ष्या, यू फूल (तू हे काय केलंस लक्ष्या, मूर्ख) खूप वाईट.'

महेश पुढे म्हणाले, 'लक्ष्या जर आज असता तर माझं आयुष्य खूप वेगळं असतं. मला वैयक्तिक आयुष्यात तसंच माझ्या चित्रपटांसाठी त्याचा नक्कीच खूप फायदा झाला असता. तो गेल्याने अचानक माझ्या आयुष्यामध्ये एक पोकळी निर्माण झाली. जेव्हा मी ‘खबरदार’ हा चित्रपट केला, तेव्हा ती माझी अशी पहिली कलाकृती होती, जिथे माझ्याबरोबर माझा लक्ष्या नव्हता. म्हणून त्या चित्रपटाच्या सुरुवातीला मी त्याचा फोटो लावला होता आणि ही दोस्ती तुटायची न्हाय हे गाणं त्या फोटोला जोडलं होतं.' महेश यांचा 'झपाटलेला ३' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात ते एआय टेक्नॉलॉजी वापरून लक्ष्मीकांत यांना दाखवण्यात येणार आहे.

mahesh kothare
माझ्यासाठी हा अवघड निर्णय... अखेर स्मिता शेवाळेने सांगितलं 'मुरांबा' मालिका सोडण्यामागचं कारण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.