Mahir Pandhi: टेलिव्हिजनवरील सुप्रसिद्ध अभिनेत्यावर गुंडांनी केला प्राणघातक हल्ला; अभिनेत्याने शहराच्या सुरक्षाव्यवस्थेवर उठवले प्रश्नचिन्ह

On Instagram, he shared a video about the attack on him: या हल्ल्यात महीरने गाडीचं झालेलं नुकसानाचा व्हिडीओ आपल्या इंस्टाग्रामवर शेअर करत ही माहिती दिली आहे.
mahir pandhi
mahir pandhisakal
Updated on

Mumbai: महिर हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय असलेल्या छोटी सरदारनी, वंशज अशा मालिकांमधून झळकला आहे. आता तो वंशज या मालिकेमध्ये दिग्विजय ही भूमिका करत आहे. आज मंगळवारी इंस्टाग्रांवर त्याने आपल्यावर झालेल्या हल्ल्याविषयी व्हिडीओ शेअर करत माहिती दिली आहे. महीर बाहेर असताना त्याच्यावर हा हल्ला झाला. या भयावह परिस्थितीतून तो वाचला म्हणून त्याने आभार देखील व्यक्त केले आहे.

महीरने कारवर झालेल्या हल्ल्याविषयीचा व्हिडीओ शेअर करत शहरातील सुरक्षेबाबतचा प्रश्न उपस्थित केला आहे. कारच्या काचांचा या हल्ल्यामध्ये कशाप्रकारे चुराडा झाला आहे याबाबत त्याने व्हिडओमधून दाखवले आहे.

Is Mumbai Is Safe? असे म्हणत त्याने शहराच्या सुरक्षाव्यवस्थेवर उठवला प्रश्नचिन्ह आहे.

"आज माझ्यावर दिवसाढवळ्या प्राणघातक हल्ला करण्यात आला ज्यामध्ये मला काही झाले नाही परंतु माझ्या कारचे नुकसान झाले आहे. कारच्या काचांचा अक्षरश चुराडा झाला आहे. हे काय मी बेशिस्तपणे कार चालवल्यामुळे झालेलं नसून खरोखर हा हल्ला झाला आहे."असेही त्याने सांगितले.

महीरच्या चाहत्यांनी आणि टेलिव्हिजन कमिटीने त्याला मदत व सुरक्षा देण्याची मागणी केली आहे. सार्वजनिक ठिकाणांवरील सुरक्षा आणि वाढीव उपाययोजनांची गरज असल्याचा मुद्दा हा हल्ला अधोरेखीत करत आहे.

कोण आहे महीर....

छोट्या पडद्यावर प्रसिद्ध असलेल्या छोटी सरदारनी आणि वंशज या मालिकेमध्ये त्याने प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. वंशज मध्ये साकार केलेला दिग्विजय या भूमिकेमधून त्याची लोकप्रियता वाढली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.