Anurag Kashyap : "त्यांची अभिनेत्री २५० रुपयांची साडी नेसते" ; कलाकारांच्या टीमबाबत बोलणाऱ्या दिग्दर्शक अनुरागला मेकअप आर्टिस्टचे खडेबोल

Makeup Artist opens up about Anurag Kashyap interview : अनुराग कश्यपने मागील एका मुलाखतीत कलाकारांच्या टीमबाबत केलेल्या वक्तव्यानंतर एका मेकअप आर्टिस्टने त्याला खडेबोल सुनावले.
Anurag Kashyap
Anurag KashyapEsakal
Updated on

Anurag Kashyap Controversy : 'गँग्ज ऑफ वासेपूर','देव डी' या गाजलेल्या सिनेमांचा दिग्दर्शक अनुराग कश्यप त्याच्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी ओळखला जातो. मध्यंतरी एका मुलाखतीत अनुरागने कलाकारांच्या टीमबाबत नाराजी व्यक्त करत त्यांच्यावर टीका केली. याबाबत मेकअप आर्टिस्टने अनुराग याला खडेबोल सुनावले.

फिट्ट मुह या पॉडकास्ट चॅनेलला जॅकलिन फर्नांडिसचा मेकअप आर्टिस्ट शान मुत्ताहिलने मुलाखत दिली. त्यावेळी त्याने अनुराग कश्यप यांच्या वक्तव्यावावर टीका केली. तो म्हणाला कि,"अनुराग सर जे काही त्या मुलाखतीमध्ये म्हणाले त्या त्यांच्या जगातील गोष्टी आहेत जिथे ते वावरतात. पण त्या पलीकडेही जग आहे. अनुराग सर आता इतके यशस्वी सिनेमे दिल्यानंतर एक नवीन दिग्दर्शक ज्या बजेटमध्ये सिनेमे बनवतो त्या बजेट सिनेमा बनवू शकतील का ? नाही अर्थातच नाही. त्यांना आमचा मत्सर वाटतो आणि ते मी समजू शकतो. कारण आम्हाला कोणत्याही मॅनेजर पेक्षा, सहाय्यक दिग्दर्शकापेक्षा आणि कॅमेरा डिपार्टमेंटमध्ये काम करणाऱ्या माणसांपेक्षा जास्त पैसे मिळतात. "

Anurag Kashyap
Anurag Kashyap : 'बॉलीवूड अजुन खूपच मागे, ते फार तर रिमेक करु शकतात..'; मल्याळम सिनेमे पाहून अनुरागची प्रतिक्रिया

शानने पुढे असंही म्हंटलं कि, अनुराग सर हे सगळं समजू शकत नाही आणि त्यांना कलाकारांच्या टीमची गरज भासत नाही कारण ते करण जोहर, मोहित सूरी सारखे सिनेमे बनवत नाही जिथे अभिनेत्री शिफॉनच्या साडीत आणि ब्लो ड्राय केलेल्या हेअरस्टाईलमध्ये काम करते. उलट ते असे सिनेमे बनवतात जिथे त्यांची हिरोईन दूर खेडेगावात २५० रुपयांची कॉटन साडी नेसून रडत असते. पण याचा अर्थ असा नाही होतं कलाकारांच्या टीमची फी कमी होते.

“जेव्हा त्यांच्याकडे अभिनेत्रीचा मेकअप आणि केशरचना करण्यासाठी दीड लाख रुपयांची मागणी केलं जेव्हा त्यांच्या हिरोईनला गरजही नसते तेव्हा त्यांना अर्थतच राग येत असेल हे मी समजू शकतो. पण सगळ्यांनाच या कामाचे १ किंवा २ लाख रुपये मिळत नाहीत. आम्ही मोजके दहाजण आहोत. पहिली गोष्ट मला आतापर्यंत कधीच त्यांच्याकडून कामासाठी फोन आला आहे. पण जर ते आमच्यासारख्या कलाकारांना फोन करत असतील तर तिथे फक्त हिरोईनच्या डोळ्याखाली काळी वर्तुळ बनवा किंवा तिचे केस विस्कटल्याप्रमाणे करा अशीच कामं असतील." असं तो पुढे म्हणाला.

Anurag Kashyap
Anurag Kashyap & Abhay Deol Controversy : "मी जर खरं बोललो तर अभय कोणाला तोंड दाखवू शकणार नाही" ; अखेर 'त्या' वादावर अनुरागने सोडलं मौन

मध्यंतरी जेनीस सिक्वेराला दिलेल्या मुलाखतीमध्ये अनुरागने कलाकारांच्या टीमवर टीका केलं होती. कलाकार स्वतःच्या दिमतीला एक शेफ ठेवतात ज्याचा पगार दिवसाला २ लाख रुपये असतो आणि तो त्यांना हवं तसं पौष्टिक जेवण बनवून देतो. ते पौष्टिक जेवण आणि त्याचं एखाद्या पक्ष्याच्या अन्नाइतकं असलेलं प्रमाण बघून कळतच नाही हे नेमकं काय जेवण आहे.

तर ह्यूमन्स ऑफ सिनेमाला दिलेल्या मुलाखतीत अनुरागने टीका करताना म्हंटल कि, "सिनेमा बनवण्याला जितका खर्च येतो त्यापेक्षा अधिक खर्च कलाकारांच्या टीमसाठी येतो. कलाकार एका जंगलाच्या मध्यभागी शूटिंग करत असतात पण त्यांची टीम एका लांब ठिकाणी फक्त एक स्पेशन बर्गर आणायला जाते ज्याची मागणी कलाकाराने केलेली असते. "

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.