बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल मलायका अरोराचे वडिल अनिल अरोरा यांनी राहत्या घराच्या मजल्यावरीन उडी मारत जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मात्र, आता या घटनेला नवे वळण मिळाले आहे. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अनिल अरोरा यांनी जीवन संपवले नसून ते घराच्या सहाव्या मजल्यावर असलेल्या बाल्कनीतून खाली पडले आहेत. या घटनेप्रकरणी आता मुंबई पोलीस वेगाने चक्रे फिरवत आहेत.
मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अनिल अरोरा हे बाल्कनीत उभे असताना अचानक खाली पडले. त्यानंतर त्यांना गंभीर दुखापत झाली होती.