Malayalam film: भाषा समजणार नाही, पण प्रत्येक सीन लक्षात राहिल; बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणारे 'हे' तीन मल्याळम सिनेमे नक्की बघा

Entertainment News: काही लोकांना मल्याळम भाषा समजत नाही, पण तरी देखील या चित्रपटांमधील सीन्समध्ये भावना प्रेक्षकांपर्यंत पोहचत आहेत.
Malayalam film: भाषा समजणार नाही, पण प्रत्येक सीन लक्षात राहिल; बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणारे 'हे' तीन मल्याळम सिनेमे नक्की बघा
Updated on

Malayalam Movies: हिंदी,मराठी, तेलुगू आणि तामिळ चित्रपटांसोबतच आता भारतात मल्याळम चित्रपटांचा देखील दबदबा दिसत आहे. विविध विषयांवर आधारित असणारे मल्याळम चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती देखीस मिळत आहे. काही लोकांना मल्याळम भाषा समजत नाही, पण तरी देखील या चित्रपटांमधील सीन्समध्ये भावना प्रेक्षकांपर्यंत पोहचत आहेत. या चित्रपटांच्या कथा चांगल्या असल्यामुळे हे चित्रपट सध्या प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवताना दिसत आहेत. यावर्षी विविध मल्याळम चित्रपट रिलीज झाले. त्यामधील तीन चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. या तीन चित्रपटांबद्दल जाणून घेऊयात...

मंजुम्मल बॉईज (Manjummel Boys)

फेब्रुवारी महिन्यात मंजुम्मल बॉईज हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाची सोशल मीडियावर बरीच चर्चा झाली. चित्रपटातील सीन्स आणि गाण्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली. Sacnilk च्या रिपोर्टनुसार, या चित्रपटानं जगभरातील बॉक्स ऑफिसवर जवळपास 240.94 कोटींची कमाई केली. या चित्रपटाची कथा सत्य घटनेवर आधारित आहे. कोचीजवळील मंजुम्मेल नावाच्या भागात राहणाऱ्या मुलांची कथा या चित्रपटात दाखवण्यात आली आहे.

अदुजीविथम (द गोट लाइफ) Aadujeevitham (The Goat Life)

अदुजीविथम (द गोट लाइफ) हा चित्रपट मार्च महिन्यात रिलीज झाला.बेन्यामिन यांच्या कादंबरीवर अदुजीविथम या चित्रपटाचं कथानक आधारित आहे. या चित्रपटात पृथ्वीराज सुकुमारननं प्रमुख भूमिका साकारली आहे.

आवेशम (Aavesham)

आवेशम हा चित्रपट एप्रिल महिन्यात रिलीज झाला. या चित्रपटातील फहद फसिलच्या अभिनयानं अनेकांची मनं जिंकली. हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला. या चित्रपटाचं बजेट 30 कोटी होतं आणि या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर 160 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे.

Malayalam film: भाषा समजणार नाही, पण प्रत्येक सीन लक्षात राहिल; बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणारे 'हे' तीन मल्याळम सिनेमे नक्की बघा
Anurag Kashyap : 'बॉलीवूड अजुन खूपच मागे, ते फार तर रिमेक करु शकतात..'; मल्याळम सिनेमे पाहून अनुरागची प्रतिक्रिया

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()