National Film Awards 2024 : मल्याळी भाषेतील अट्टम ठरला सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय सिनेमा ; काय आहे सिनेमाची कथा, वेगळेपण जाणून घ्या ?

Attam Movie won National Best Film Award 2024 : मल्याळी भाषेतील अट्टम या सिनेमाला सर्वोत्कृष्ट सिनेमाचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला. जाणून घेऊया या सिनेमाविषयी काही खास गोष्टी.
Attam Movie
Attam MovieEsakal
Updated on

Entertainment News : भारतीय सिनेविश्वात मानाचं स्थान असणारे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आज जाहीर करण्यात आले. यंदा राष्ट्रीय पुरस्करांचं ७ ० वं वर्ष आहे. २ ० २ ४ वर्षीच्या या पुरस्कारांना या निमित्त एक वेगळंच महत्त्व प्राप्त झालं आहे. मल्याळी भाषेतील अट्टम या सिनेमाला यंदाचा सर्वोत्कृष्ट सिनेमाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला. तर या सिनेमाचे दिग्दर्शक आनंद एकर्षी यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. सगळीकडे चर्चेत असलेल्या या सिनेमाचं वेगळेपण जाणून घेऊया.

गेला बराच काळ मल्याळी सिनेविश्व प्रयोगशील सिनेसृष्टी म्हणून उभारी घेत आहे. या आधीही अनेक मल्याळी सिनेमांचं राष्ट्रीय स्तरावर कौतुक झालं आहे आणि आता अट्टम हा सिनेमानेही या यादीत स्थान मिळवलं. आनंद एकर्षी यांचं दिग्दर्शन असलेला हा सिनेमा स्त्रियांचं शोषण, त्याकडे पुरुषांचा बघण्याचा दृष्टिकोन आणि सत्तेचा किंवा पदाचा दबाव यावर भाष्य करतो.

सिनेमाची कथा

अट्टम या सिनेमाची कथा एका नाटकाच्या ग्रुपभोवती फिरते. या ग्रुपमध्ये घडणार नाट्य आणि लोकांचे परिस्थितीनुसार बदलणारे चेहरे यावर हा सिनेमा बेतलाय. एका नाटकाच्या ग्रुपमध्ये एक सुप्रसिद्ध अभिनेता सहभाग घेतो. त्याचवेळी त्या ग्रुपमध्ये एकमेव अभिनेत्री असलेली अंजली नाटकानंतर अचानक मिटिंग घेते आणि त्या अभिनेत्यावर लैगिंक हिंसाचाराचा आरोप करते. सुरुवातीला ग्रुपमधील इतर अभिनेते तिची साथ देतात पण लंडनमध्ये प्रयोग करण्याची संधी असल्याचा एक फोन येतो आणि सगळेचजण तिच्यापासून दुरावतात. त्यानंतर पुढे काय घडत याची गोष्ट या सिनेमात पाहायला मिळते.

या सिनेमात विनय फोर्ट, झरीन शिहाब आणि कलाभवन शेजोन यांची मुख्य भूमिका होती. हा सिनेमा मनोरंजन क्षेत्रात काम करणाऱ्या स्त्रियांकडे पुरुषांचा बघण्याचा दृष्टिकोन, तिथे होणारा लैगिंक छळ, त्याची प्रखरता, स्त्रियांबाबत पुरुषांची असलेली मतं, एखाद्या मोठ्या व्यक्तीच्या पदाचा असलेला दबाव आणि यात स्त्रियांचं होणार मानसिक शोषण यावर भाष्य करतो.

एकीकडे देशात स्त्रियांवर होणाऱ्या अन्यायाबाबत दिवसेंदिवस रोष वाढत चाललेला असताना हा सिनेमा या सिनेमाच्या माध्यमातून पुरुषी मनोवृत्ती, लोभ आणि त्यामुळे एका स्त्रीवर होत असलेला अन्याय यावर भाष्य करतो. उत्तम पटकथा, संवादलेखन आणि तगड्या भूमिका हाच या सिनेमाचा यूएसपी आहे.

५ जानेवारी २ ० २ ४ मध्ये रिलीज झालेल्या या सिनेमाला सर्वोत्कृष्ट सिनेमाबरोबरच, सर्वोत्कृष्ट संकलन आणि या सिनेमाचे दिग्दर्शक आनंद एकर्षी यांना सर्वोत्कृष्ट पटकथेचा पुरस्कार देण्यात आला आहे. या आधी या सिनेमाला केरळ फिल्म क्रिटिक असोसिएशन अवॉर्डचे सर्वोत्कृष्ट सिनेमा या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. सर्वोत्कृष्ट सहाय्यक भूमिकेसाठी कलाभवन शेजोन आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री या पुरस्काराने झरीन शिहाब यांना सन्मानित करण्यात आलं होतं.

सध्या सगळीकडे चर्चेत असलेला हा सिनेमा तुम्हाला अमेझॉन प्राईम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येईल. याशिवाय रिषभ शेट्टीच्या कांतारा सिनेमाला सर्वोत्कृष्ट लोकप्रिय सिनेमा हा पुरस्कार मिळाला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.