छोट्या पडद्यावर अभिनेत्री मानिनी डे हिला चांगलीच लोकप्रियता मिळालेली आहे. आता ती झी टीव्हीवरील ‘रब से है दुआ’ या मालिकेमध्ये ‘गझल’ या एका शक्तिशाली आणि आव्हानात्मक भूमिकेमध्ये दिसून येणार आहे. याबाबत मानिनी म्हणाली, ‘‘जेव्हा माझ्याकडे ही भूमिका आली तेव्हा माझ्या असे लक्षात आले की, हे एक असे आव्हान असणार आहे जे स्वीकारायला मला निश्चितच आवडेल.