'माझ्या नवऱ्याची बायको' फेम अभिनेत्याच्या मुलाच्या मदतीसाठी सरसावले मराठी कलाकार; प्रेक्षकांनाही केलं आवाहन

Marathi Celebrity Helped Atul Virkar अभिनेता अतुल वीरकर याच्या मुलाच्या मदतीसाठी आता पुन्हा एकदा कलाकारांनी मदतीचं आवाहन केलं आहे.
atul virkar with son
atul virkar with son sakal

'माझ्या नवऱ्याची बायको', 'येऊ कशी तशी मी नांदायला' यांसारख्या मालिकांमध्ये झळकलेले अभिनेते अतुल वीरकर यांच्या मुलाला एक गंभीर आजार आहे. ही गोष्ट गेल्या वर्षी सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आली होती. प्रियांशला 'ॲलन-हर्ंडन-ड्युडली सिंड्रोम (एएचडीएस) हा आजार आहे. त्याच्या या आजारावर वर्षाकाठी किमान १० लाख खर्च येतो. यापूर्वी अतुल आपल्या कामातून मुलाच्या उपचाराचा खर्च भागवत होते. मात्र करोना काळात काम बंद झाल्यावर त्यांनी घरोघरी जाऊन अगरबत्ती, पापड विकले होते. त्यानंतर त्यांनी सेलिब्रिटी फूड ट्रक सुरू केला.

या गोष्टीसाठी हवीय मदत

या आजारावरील उपचार खर्च खूप मोठा असल्याने अतुलने सोशल मीडियावर अनेकांकडून आर्थिक मदत मागितली होती. त्यांना वेळोवेळी तशी मदत मिळाली देखील त्यामुळे प्रियांशवर उपचार करण्यात त्यांना यश आले. मात्र आता त्यांना प्रियांशसाठी एक वॉकर घ्यायचा आहे आणि त्याची किंमत बरीच मोठी आहे. त्यामुळे पुन्हा एकदा अतुल यांच्यासाठी मराठी इंडस्ट्री पुढे सरसावली आहे. अभिनेता निलेश साबळे अतुल यांना मदत करतोच आता त्याने प्रेक्षकांनाही मदतीचं आवाहन केलं आहे. अतुल यांच्या मुलाच्या मदतीसाठी 'ऑल द बेस्ट' या नाटकाचा खास प्रयोग ठेवण्यात आला आहे.

atul virkar
atul virkarsakal

एक तिकीट प्रियांशसाठी अशी एक मोहीम या नाटकाच्या मार्फत राबवण्यात आली आहे. या नाटकाच्या प्रयोगातून मिळणारा निधी हा प्रियांशच्या वॉकरसाठी वापरण्यात येणार आहे. निलेश स्वतः तिकीट घेत प्रियांशला मदत करणार आहेत. तसेच त्याने इतर प्रेक्षकांनाही नाटकाच्या प्रयोगाला येण्याचं आवाहन केलं आहे.

atul virkar with son
Marathi Actress Mother's Death: लोकप्रिय मराठी अभिनेत्रीला मातृशोक; आईच्या आठवणीत शेअर केली भावुक पोस्ट, म्हणते-

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com