Kolkata Nirbhaya Case : "आता तिच्यावर झालेल्या अत्याचाराची काय कारणं द्याल ?" मराठी कलाकारांचा कोलकाता निर्भया कांडावर संतप्त सवाल

Marathi Actors Post On Kolkata Nirbhaya Case : मराठी कलाकारांनी कोलकाता निर्भया कांडावर संपतं पोस्ट करत त्यांची नाराजी व्यक्त केली.
Hemangi Kavi, Siddharth Chandekar and Rohit Parshuram
Hemangi Kavi, Siddharth Chandekar and Rohit ParshuramEsakal
Updated on

Nirbhaya 2 Case : कोलकाता मधील महिला डॉक्टरबाबत घडलेल्या निर्घृण कृत्यामुळे संपूर्ण देश हादरला आहे. ३ १ वर्षीय ट्रेनी महिला डॉक्टरची ती काम करत असलेल्या हॉस्पिटलच्या सेमिनार हॉलमध्येच बलात्कार करून हत्या करण्यात आली. या घटनेमुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. मराठी कलाकारही या घटनेवर व्यक्त झाले असून त्यांनी त्यांच्या तीव्र प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्यक्त केल्या.

मराठी अभिनेत्री हेमांगी कवीने सोशल मीडियावर पोस्ट करत या घटनेबाबत मुलींना नीट वागण्याचे धडे देणाऱ्या समजाला जाब विचारला. ती म्हणाली,"आता तर ती तिच्या रोजच्या कामाच्या ठिकाणी होती,

कुठल्याही पब शब, late night show बघून घरी जात नव्हती,ती तिच्या कुठल्याही मित्र, यार, boyfriend सोबत नव्हती,कुठलेही ‘तसले’ उद्युक्त करणारे चाळे करत नव्हती!

Trainee Doctor असल्यामुळे मला तरी वाटतं तिनं कुठलाही भडक make up केला नसावा, कपडे ही तोकडे नसावेत,

तरीही ती सुरक्षित नव्हती!

आता काय बरं कारणं शोधायची?

नाही, नाही काहीतरी तिचंच चुकलं असणार.

काय चुकलं असावं आता तिचं?

कसंय, हे शोधायलाच हवं कारण पुढच्या पिढीला ‘मुलींनी कसं वागू- बोलू- राहू नये’ सांगून घाबरवून म्हणून ठेवता येईल हो, दुसरं काही नाही!"

तर अभिनेता सिद्धार्थ चांदेकरनेही सोशल मीडियावर पोस्ट लिहीत त्याचा निषेध व्यक्त केला. "मला वाटतेय मुलगी शिकली प्रगती झाली हे आपण नको बोलायला आता. मुलगी शिकतेय, तिला शिकू दिलं जात नाहीये. ती प्रगती करण्याची धडपड करतेय पण तिची प्रगती होऊ दिली जात नाही. आपल्या घरातील मुलगी सातच्या आत परत येतेय का नाही यापेक्षा आपल्या घरातला मुलगा संध्याकाळी सात नंतर कुठे जातो, काय करतो, काय संगत आहे त्याची ? कुणाशी बोलतोय ? काय विचार आहेत त्याचे हे बघणं जास्त गरजेचं आहे. खरंच या देशातला मुलगा शिकला, तो सुसंस्कृत झाला, स्त्रियांचा आदर करायला शिकला तर या देशाची प्रगती झाली. या देशातल्या मुलाचे विचार बदलले आणि त्याच्यातल्या अक्षम्य चुकांना पाठीशी घालणाऱ्या त्याच्या आई-वडिलांचे, त्याच्या नातेवाईकांचे आणि त्याच्या मित्रांचे विचार बदलले तरच ती भारतमाता स्वतंत्र झाली असं आपण अभिमानाने म्हणू शकतो. नाहीतर स्वातंत्र्यानंतर ७ ८ वर्षांनी सुद्धा ती दहशतीतच जगतेय. विचार करूया." असं व्हिडिओच्या माध्यमातून व्यक्त होत त्याची नाराजी बोलून दाखवली.

"एका मुलीचा बाप म्हणून यावर्षी स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा नाही द्याव्याशा वाटल्या. एक फक्त पुरुष स्वतंत्र असलेल्या देशात राहतोय आपण. ज्या दिवशी स्त्रिया स्वतंत्र होतील त्या दिवशी आनंदाने शुभेच्छा देऊ एकमेकांना." अशी पोस्ट रोहित परशुरामने केली.

क्रिकेटर श्रेयस अय्यरने सुद्धा सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्याचा संताप व्यक्त केला. "या इतक्या वर्षांमध्ये काहीच बदललं नाहीये. या भयंकर घटनेमुळे मी खरंच खूप हादरून गेलो. या घटनेशी संबंधित सगळ्या दोषी व्यक्तींना शिक्षा झालीच पाहिजे. आम्हाला न्याय हवाय." अशी पोस्ट श्रेयसने केली आहे.

कोलकातामध्ये घडलेल्या या घटनेवर बॉलिवूड कलाकारही व्यक्त झाले आहेत. प्रशासन आता या घटनेवर काय कारवाई करणार आणि पीडितेला न्याय मिळणार का ? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

Hemangi Kavi, Siddharth Chandekar and Rohit Parshuram
Kolkata Doctor Murder: हॉस्पिटलमध्ये मध्यरात्री जमावाचा धुडगूस, तोडफोडीचा व्हिडिओ व्हायरल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.