Navjot Bandivdekar: 'माणसामधील खरी संस्कृती टिपण्याचा प्रयत्न'..

The film is directed by Navjot Narendra Bandivdekar: पॅनोरमा स्टुडिओज सविनय सादरकर्ते, नॅविअन्स स्टुडिओ यांच्या सहकार्याने ‘घरत गणपती’ हा मराठी चित्रपट येत्या २६ जुलै रोजी चित्रपटगृहात दाखल होणार आहे.
Navjot Bandivadekar
Navjot Bandivadekarsakal
Updated on

Interview from Director: पॅनोरमा स्टुडिओज सविनय सादरकर्ते, नॅविअन्स स्टुडिओ यांच्या सहकार्याने ‘घरत गणपती’ हा मराठी चित्रपट येत्या २६ जुलै रोजी चित्रपटगृहात दाखल होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन नवज्योत नरेंद्र बांदिवडेकरने केले आहे. कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, नम्रता बांदिवडेकर, गौरी कालेलकर-चौधरी यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. निसर्गाचा वरदहस्त लाभलेल्या कोकणात घडणारी घरत कुटुंबाची मजेशीर गोष्ट आपल्याला या चित्रपटातून पहायला मिळणार आहे. नवज्योतचा दिग्दर्शक म्हणून पहिलाच मराठी चित्रपट आहे. या निमित्त त्याच्याशी साधलेला संवाद....

तुझ्या चित्रपटाचे नाव ‘घरत गणपती’ असे आहे. हे नाव आगळेवेगळे आहे, परंतु खूप लोकांना प्रश्न पडला आहे की, ‘घरत गणपती’ या शीर्षकामागे नेमकी गंमत काय आहे?

घरत हे कोकणातील एका कुटुंबाचं आडनाव आहे. घरतांकडे गणपती आला आहे आणि त्यांच्याकडे त्याचा उत्सव साजरा करण्यात येतो. तो आम्ही लोकांपर्यंत आणण्याचा प्रयत्न करतोय. पूर्वी कुटुंब खूप मोठी असायची, पण आता काही लोक पुणे वा मुंबई अशा मोठ्या शहरात रहायला गेले, पण ही सगळी मंडळी गणपतीत एकत्र येऊन उत्सव साजरा करतात. ते या चित्रपटाद्वारे आम्ही दाखविण्याचा प्रयत्न केला आहे.

Navjot Bandivadekar
English Movie: ‘बार्बेरिअन’; नातेसंबंध आणि शोषणाच्या इतिहासाची भयकथा

या चित्रपटाचे कथानक काय आहे आणि ही कथा तुला कशी काय सुचली?

चार वर्षांपूर्वी मी आणि माझा सह-लेखक आलोक सुतार आम्ही गोष्ट लिहायला घेतली. गंमत म्हणजे माझ्या घरी गेल्या ७५ वर्षांपासून गणपती येतोय. त्यामुळे लहानपणापासून गणपतीची खूप आवड होती. आपण आजपर्यंत अनेक गणपतीवरील गाणी ऐकली आहेत, पण गणपतीचा विषय सहसा कुणी मांडलेला नाही. आपली संस्कृती काय आहे हे लोकांपर्यंत पोहोचलेले नाही, तर माझं असं मत होतं की हेच आपण दरवर्षी अनुभवतो तर तेच लोकांपर्यंत घेऊन जावं आणि गणपती हा सर्वांचा आवडता विषय आहे. मला खात्री आहे की लोकांना तो नक्की आवडेल.

गणपतीला सगळे कुटुंब एकत्र येते आणि हा सण साजरा करतात, पण कधी कधी कुटुंबातील हेवे-दावेही समोर येतात. काही गमतीजमतीही घडतात. या चित्रपटाच्या माध्यमातून असं काही दाखविण्याचा प्रयत्न केला आहे का?

हो, नक्कीच. गणपती सणाला लोक जेव्हा एकत्र घरी येतात, तेव्हा मौजमस्ती, रुसवे-फुगवे, हेवे-दावे होत असतात. या चित्रपटामध्ये तुम्हाला या सगळ्या बाबी पहायला मिळतील. मला खात्री आहे जेव्हा तुम्ही चित्रपट पहाल, तेव्हा या चित्रपटातील १४ व्यक्तिरेखांपैकी एका तरी व्यक्तिरेखेशी रिलेट कराल.

Navjot Bandivadekar
Anant Ambani Wedding : यूपीच्या या शहरातील 'हा' दुकानदार अनंत अंबानींच्या लग्नासाठी बनवणार चाट, या 5 गोष्टी असतील मेनूमध्ये...

तुझ्याकडे ही कथा होतीच, पण पॅनोरमा स्टुडिओशी तू कसा कनेक्ट झालास?

चित्रपट बनवल्यानंतर माझ्याकडे एक प्रश्न होता की, आपण इतक्या मोठ्या पातळीवर चित्रपट बनवत आहोत, तर तितक्याच मोठ्या पातळीवर प्रेक्षकांपर्यंतसुद्धा पोहोचला पाहिजे. तर जेव्हा आम्ही पॅनोरमाला आमचा चित्रपट दाखवला, तेव्हा त्यांना तो प्रचंड आवडला. तेव्हा त्यांनी मला सांगितलं की, आपण हे करायचंय. हा हिंदीतील इतका मोठा स्टुडिओ जेव्हा आमच्यासोबत असोसिएट झाला, तेव्हा मला खात्री आहे की ते हा चित्रपट उत्तमरीत्या लोकांपर्यंत पोहोचवणार आहेत.

दिग्दर्शक म्हणून तुझा प्रवास कसा सुरू झाला?

मी सुरुवातीला चार वर्षे हॉलीवूडमध्ये काम केलं. येथे आल्यानंतर लगेच एक प्राॅडक्शन हाऊस चालू केलं. हा माझा पहिला चित्रपट जरी असला तरी या अगोदर मी शॉर्टफिल्म्स वगैरे केल्या आहेत. माझ्या आतापर्यंतच्या शॉर्टफिल्म्सना राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरचे जवळपास १० ते १५ पुरस्कार मिळालेले आहेत. दिग्दर्शक म्हणून माझा पहिलाच चित्रपट जरी असला तरी मला दिग्दर्शनाचा अनुभव खूप आहे.

Navjot Bandivadekar
Swapnil Joshi: नवऱ्याला अभिनेत्रींसोबत रोमान्स करताना पाहून काय असते स्वप्नीलच्या बायकोची प्रतिक्रिया? प्रार्थनाने दिलं उत्तर

कलाकारांची निवड करताना काही अभ्यास केला होतास का?

या चित्रपटात सगळेच कलाकार अनुभवी आहेत, त्यामुळे मला त्यांच्याबरोबर काम करणे सोपे गेले. शिवाय त्यांच्यातील केमिस्ट्री उत्तम जुळलेली आहे. विशेष म्हणजे आम्ही लिहिताना ज्या प्रकारे व्यक्तिरेखा मनात ठेवल्या होत्या त्या व्यक्तिरेखासुद्धा त्यांनी खूप वरच्या पातळीवर पोहोचवल्या आहेत.

चित्रपटात असा कोणता प्रसंग आहे तो चित्रित करताना खूप कठीण वाटलं?

असं पहायला गेलं तर आव्हाने तर खूप होती. कारण एका-एका सीनमध्ये आठ-नऊ कलाकार एकत्र होते. त्यामुळे त्यांच्याबरोबर ते लॉजिकली काम करणं खूप कठीण होतं, पण आम्ही ते खूप छान प्रकारे केलं, असं मला वाटतं.

Navjot Bandivadekar
Amitab Bachchan: अमिताभ बच्चन यांच्या शिस्तीने फिटनेस ट्रेनरही प्रभावित

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.