‘कुटुंब’ हा आपल्या प्रत्येकाचा जिव्हाळ्याचा विषय. कुटुंबातील, नात्यागोत्यातील प्रत्येकाशी आपले प्रेमाचे, स्नेहाचे एक वेगळे नाते असते. मराठी चित्रपटांतूनही कौटुंबिक विषय अतिशय उत्तमतेने हाताळलेले आपण पाहतो.
आंबे, सुपारी, केळी, फणसाच्या बागा, काजू, कोकमाची झाडे असा निसर्गाचा वरदहस्त लाभलेल्या कोकणाच्या पार्श्वभूमीवर घडणारी घरत कुटुंबाची मजेशीर गोष्ट आपल्याला आगामी ‘घरत गणपती’ या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे.
मनोरंजन क्षेत्रात तडाखेबंद कलाकृतींनी आपले वेगळे स्थान निर्माण करणारे पॅनोरमा स्टुडिओज, नॅविअन्स स्टुडिओ यांच्या सहकार्याने हा चित्रपट साकारीत आहेत. हा चित्रपट २६ जुलैला आपल्या भेटीला जवळच्या चित्रपटगृहा़ंत येत आहे.
चित्रपटाचे आकर्षक पोस्टर आणि पहिली झलक समोर आली आहे. नातेसंबंधातील प्रेम, गोडवा आपल्या सणांच्या माध्यमांतून अधिक दृढ होत असतो. मायेने आणि आपलेपणाने माणसे जोडणाऱ्या घरत कुटुंबातील ‘श्री गणराया’च्या आगमनावेळी घडणारी गमतीशीर गोष्ट पाहायला मिळणार आहे.
अतिशय सुंदर कथाविषय, त्याला अभिनयसंपन्न कलाकारांची जोड, यातून एक उत्तम कलाकृती दिग्दर्शक नवज्योत नरेंद्र बांदिवडेकर घेऊन येत आहेत. निकिता दत्ता, भूषण प्रधान, अश्विनी भावे, अजिंक्य देव, संजय मोने, शुभांगी लाटकर,
शुभांगी गोखले, डॉ. शरद भुताडिया, सुषमा देशपांडे, परी तेलंग, आशिष पाथोडे, रूपेश बने, राजसी भावे, समीर खांडेकर, दिव्यलक्ष्मी मैस्नाम अशी कलाकार मंडळी या चित्रपटात आहेत.
कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, नम्रता बांदिवडेकर, नवज्योत नरेंद्र बांदिवडेकर, गौरी कालेलकर-चौधरी यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. पॅनोरमा स्टुडिओज ‘घरत गणपती’ चित्रपटाच्या सोबत भक्कमपणे उभा असल्याचे पॅनोरमा स्टुडिओजचे व्यवस्थापकीय संचालक कुमार मंगत पाठक यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.