Watch Teaser : 'घरत गणपती' चित्रपटाची पहिली झलक प्रदर्शित, घरत कुटुंबियांच्या उपस्थितीत रंगला सोहळा

Gharat Ganpati Teaser Out: भूषण प्रधान आणि निकिता दत्ता यांची मुख्य भूमिका असलेल्या घरत गणपती सिनेमाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीस आला.
Gharat Ganpati
Gharat Ganpati Esakal

Gharat Ganpati : कौटुंबिक चित्रपट हा प्रेक्षकांच्या जिव्हाळ्याचा विषय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना भावणारे कौटुंबिक चित्रपट कुटुंबाची गोष्ट सांगतात. 'घरत गणपती' हा देखील असाच एक कौटुंबिक मराठी चित्रपट आहे. ज्या घरत कुटुंब आणि कोकणातील गणेशोत्सवाची गोष्ट पाहायला मिळणार आहे.

पॅनोरमा स्टुडिओज सविनय सादरकर्दे असून नॅविअन्स स्टुडिओ यांच्या सहकार्याने ‘घरत गणपती’ हा भव्य मराठी चित्रपट येत्या २६ जुलैला प्रदर्शित होत आहे. नवज्योत नरेंद्र बांदिवडेकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, नम्रता बांदिवडेकर, नवज्योत नरेंद्र बांदिवडेकर, गौरी कालेलकर-चौधरी यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

या चित्रपटाच्या प्रमोशनला नुकतीच सुरुवात झाली असून बाप्पााच्या आशिर्वादाने ही सुरुवात झालीय. घरत कुटुंबाच्या सदस्यांनी नुकतीच श्री सिद्धिविनायक मंदिराला भेट देत बाप्पाचं दर्शन घेतलय. यंदा आपल्या घरत कुटुंबाच्या ‘घरत गणपती’ चित्रपटाचा डंका सर्वत्र जोरदार वाजू देत यासाठी मनोभावे प्रार्थना देखील केली. नुकताच पहिली झलक दाखवण्याचा सोहळा उत्साहात संपन्न झाला. उत्साह, चैतन्याने भारलेल्या वातावरणात गणपतीची विधिवत पूजा, आरती, नैवैद्य, सुग्रास जेवणाचा बेत करत हा सोहळा संपन्न झाला. यावेळी या घरत कुटुंबाच्या स्नेहाची आणि त्यांच्या बंधाची छोटीशी झलक दाखविण्यात आली.

पहा टीझर

यावेळी बोलताना चित्रपटातील कलाकारांनी सांगितलं कि , ‘आपलं प्रत्येकाचं गणपती बाप्पाशी खास असं नातं असतं. गणेशोत्सवात धमाल वेगळीच असते. हीच धमाल दाखवताना गणपती बाप्पाच्या कृपेने प्रत्येकाला नात्यांचे सूर कसे गवसणार ? हे पहायला मिळणार आहे." हा चित्रपट पाहताना निखळ आनंद तर मिळेलच पण या चित्रपटाची गोष्ट प्रत्येकाला आपल्या कुटुंबाची आणि प्रेमळ नात्यांची आठवण करून देईल हा विश्वास कलाकारांनी व्यक्त केला. या चित्रपटाच्या निमित्ताने मराठी रुपेरी पडद्यावर उत्तम कथानक व भव्यदिव्यता दिसेल असा विश्वास दिग्दर्शक नवज्योत नरेंद्र बांदिवडेकर यांनी व्यक्त केला.

Gharat Ganpati
Gharat Ganpati : ‘घरत गणपती’ २६ जुलैला रुपेरी पडद्यावर

सिनेमाची कास्ट

या चित्रपटात निकिता दत्ता, भूषण प्रधान, अश्विनी भावे, अजिंक्य देव, संजय मोने, शुभांगी लाटकर, शुभांगी गोखले, डॉ. शरद भुताडिया, सुषमा देशपांडे, परी तेलंग, आशिष पाथोडे, रूपेश बने, राजसी भावे, समीर खांडेकर, दिव्यलक्ष्मी मैस्नाम हे कलाकार झळकणार आहेत.

Gharat Ganpati
Gharat Ganpati: "कथा घराची, घरातल्या प्रत्येकाची!”; घरत गणपती चित्रपटाची घोषणा, 'या' दिवशी होणार रिलीज

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com