Meenakumari : बॉलिवूडच्या ट्रॅजेडी क्वीनचं आहे रवींद्रनाथ टागोरांशी खास नातं ; ख्रिश्चन आजी अन हिंदू आई , ट्रॅजेडी क्वीनचा मुस्लिम धर्माशी संबंध कसा ?

Meenakumari's special connection with Gurudev Ravindranath Tagore : अभिनेत्री मीना कुमारीचं गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्याशी खास नातं आहे. काय आहे हे नातं जाणून घेऊया.
Meena Kumari
Meena KumariEsakal
Updated on

Meena Kumari throwback story : ट्रॅजेडी क्वीन या नावाने ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री मीना कुमारी या आजही भारतीय प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे. दैवी सौंदर्य लाभलेल्या या अभिनेत्रीने फार कमी वयात जगाचा निरोप घेतला. उत्तम अभिनेत्री असणाऱ्या मीना कुमारी या एक उत्तम कवयित्रीही होत्या. पण तुम्हाला माहितीये का ? मीना कुमारी आणि नोबेल पारितोषिक विजेते गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांचं खास नातं आहे. काय आहे हे नातं जाणून घेऊया.

मीना कुमारी यांचं खरं नाव महजबीन बानो असं होतं. त्या लहान असताना त्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती खूप हलाखीची होती. त्यांच्या वडिलांना नोकरी नव्हती आणि त्यांची आईही खूप आजारी असायची. त्यामुळे मीना कुमारी यांचा जन्म होताच त्यांच्या वडिलांनी त्यांना अनाथाश्रमात पाठवलं होतं पण नंतर त्यांना त्यांच्या लहानग्या मुलीची काळजी वाटली आणि ते त्यांना परत घरी घेऊन आले. वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षांपासून घराला आर्थिक हातभार लावण्यासाठी सिनेमांमध्ये काम करायला सुरुवात केली आणि इथूनच त्यांचा अभिनेत्री बनण्याचा प्रवास सुरु झाला.

मीना कुमारी यांची आई हिंदू होती आणि तिचा संबंध थेट रवींद्रनाथ टागोर यांच्या घराण्याशी होत्या. याचा उल्लेख महेंद्र अवोडे यांच्या 'मीनाकुमारी एक गूढ' या पुस्तकात केला आहे.

टागोर घराण्याशी संबंध

मीना कुमारी यांचे वडील अली बक्ष हे हार्मोनियम वादक होते आणि कामाच्या शोधात ते मुंबईत आले. ते एका पारशी थिएटर मध्ये काम करत होते. याचवेळी त्यांची ओळख प्रभावती या तरुणीशी झाली. प्रभावती या हिंदू होत्या आणि त्यांचा जन्म हिंदू वडील ख्रिश्चन आई असलेल्या कुटूंबात झाला होता. प्रभावती यांच्या आई हेमसुंदरी या जन्माने हिंदू होत्या पण नंतर त्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला. हेमसुंदरी या गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या धाकट्या भावाची मुलगी होती आणि लहान वयातच ती विधवा झाली. त्यावेळी भारतात विधवांची परिस्थिती फार चांगली नसल्यामुळे त्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला. पुढे त्यांनी मेरठ येथील प्यारेलाल यांच्याशी लग्न केलं आणि त्यांच्या पोटी प्रभावती जनमाला आली. पुढे प्रभावती कामाच्या निमित्ताने मुंबईत आल्या. त्यांची ओळख अली बक्ष यांच्याशी झाली. ते दोघेही प्रेमात पडले आणि अली बक्ष यांच्याशी लग्न करण्यासाठी प्रभावती यांनी धर्म बदलला आणि स्वतःच नाव इकबाल बानो असं ठेवलं. पुढे या जोडप्याला चार मुलं झाली तर मीना कुमारी या जोडप्याचं दुसरं अपत्य होत्या.

Meena Kumari
Meena Kumari Biopic: मीना कुमारीचा बायोपीक अडचणीत, कुटूंबाने दिला कायदेशीर कारवाईचा ईशारा

मीना कुमार यांनी बालकलाकार म्हणून काम करायला सुरुवात केली. नंतर त्यांनी अनेक पौराणिक सिनेमात काम केलं. पुढे त्यांनी अनेक बॉलिवूड सिनेमांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारत प्रेक्षकांची मनं जिंकली.

Meena Kumari
Meena Kumari Biopic : 'बॉलीवूड सगळ्यात चोरटं'! मीना कुमारीचे चिरंजीव संतापले

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()