लोकप्रिय बॉलिवूड अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांच्या पूर्वाश्रमीच्या पत्नी हेलेना ल्यूक यांचं निधन झालं आहे. रविवारी ३ नोव्हेंबर रोजी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. त्यांच्या मृत्यूची बातमी लोकप्रिय नृत्यांगना आणि अभिनेत्री कल्पना अय्यर यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे. त्यांचं अमेरिकेत निधन झालंय. गेले काही दिवस त्यांची प्रकृती खालावली होती. मात्र त्यांनी डॉक्टरकडे जाण्यास नकार दिला. अखेर हेलेना यांनी या जगाचा निरोप घेतला. त्यांनी अमिताभ बच्चन यांच्या 'मर्द' या चित्रपटात काम केलं होतं. त्यात त्या एका ब्रिटिश राणीच्या भूमिकेत होत्या.
याशिवाय ती 'आओ प्यार करें', 'दो गुलाब' आणि 'साथ साथ' यासारख्या अनेक चित्रपटांमध्ये दिसली. हेलेना यांनी बॉलिवूड सुपरस्टार मिथुन चक्रवर्तीसोबत लग्न केले होते. अभिनेत्री सारिकासोबत ब्रेकअप झाल्यानंतर मिथुन चक्रवर्ती मॉडेल-अभिनेत्री हेलेना ल्यूकला भेटले. असे म्हटले जाते की दोघेही पहिल्याच नजरेत प्रेमात पडले आणि त्यांनी लग्न केले. त्यावेळी मिथुन करिअरच्या शिखरावर होता. मात्र, १९९५ मध्ये झालेला हा विवाह फार काळ टिकला नाही आणि लग्नाच्या 4 महिन्यांनंतर हेलेनाने घटस्फोट घेतला आणि मिथुन यांनी योगिता बालीशी लग्न केले.
एका मुलाखतीत हेलेना ल्यूकने सांगितलेलं की, त्या या लग्नावर खूश नव्हत्या. मिथुन यांनी आश्वासनं देऊन त्यांचा ब्रेनवॉश केला होता. मिथुन यांनी तिच्या मनावर असं बिंबवलं की जणू ते एकमेकांसाठी बनले आहेत, परंतु नंतर गोष्टी हव्या तशा घडल्या नाहीत. त्या म्हणाल्या ती त्याच्याकडे परत जाणार नाही. मात्र, मिथुनसोबत त्यांचा समेट झाल्याच्या अनेक अफवा पसरल्या होत्या. हेलेना बरीच वर्षे न्यूयॉर्कमध्ये राहत होत्या आणि चित्रपटानंतर त्यांनी डेल्टा एअरलाइन्समध्ये फ्लाइट अटेंडंट म्हणून काम करण्यास सुरुवात केली. आता त्यांनी या जगाचा निरोप घेतलाय,
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.