Panchayat 3 : वेळेआधीच पंचायत 3 चा ट्रेलर प्रदर्शित; पुन्हा एकदा रंगणार गावकरी आणि सचिवाची जुगलबंदी

Panchayat Season 3 Trailer : अमेझॉन वरील गाजलेली वेबसिरीज पंचायत 3 चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला. 17 मे ऐवजी आजच ट्रेलर रिकीज करून प्रेक्षकांना खास सरप्राईज देण्यात आलं.
Panchayat Season 3
Panchayat Season 3Esakal
Updated on

अॅमेझॉन प्राईम वरील बहुप्रतिक्षित कॉमेडी ड्रामा वेबसिरीज 'पंचायत सीजन 3' चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आलाय. 8 एपिसोड्स असलेल्या या नव्या सीजनमध्ये फुलेरा गावाची गोष्ट पुन्हा एकदा अनुभवता येणार आहे.

फुलेरा गावचा सचिव आणि ग्रामस्थ यांच्यातील जुगलबंदी पुन्हा एकदा प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.

सोशल मीडियावर रिलीज झालेल्या या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलंय की पंचायतचा सचिव म्हणून अभिषेक परत आला आहे. पण त्याला त्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी गावातील नवीन संकटांचा सामना करावा लागणार आहे.

अभिषेकला काम सांभाळून परीक्षेची तयारीही करायची आहे तर गावातील विरोधी पक्ष पुन्हा एकदा भिडणार असल्याचं या सिरीजमध्ये पाहायला मिळणार आहे. या दोन विरोधी पक्षांमधील मतभेद अभिषेक दूर करेल का? तो गावात निष्पक्ष राहून काम करू शकेल का? गावात आता नवीन कोणता ड्रामा सुरू होणार हे या नवीन सीजनमध्ये पाहायला मिळणार आहे.

पहा ट्रेलर:

28 मेला ही वेबसिरीज अमेझॉन प्राईम या प्लॅटफॉर्मवरून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. विशेष म्हणजे 17 मेला या वेब सिरीजचा ट्रेलर प्रदर्शित होणार होता पण प्रेक्षकांच्या वाढत्या उत्सुकतेमुळे वेळेआधीच ट्रेलर सोशल मीडियावर रिलीज करण्यात आला.

'ही' आहे कास्ट

जितेंद्र कुमार, रघुबीर यादव, चंदन रॉय, सान्विका आणि नीना गुप्ता या कलाकारांच्या या वेबसिरीजमध्ये मुख्य भूमिका आहेत. दीपक कुमार मिश्रा यांनी या वेब सिरीजचं दिग्दर्शन केलं आहे.

Panchayat Season 3
Panchayat 3: प्रमोशनची हटके पद्धत; भाजी मंडईतील दुधीभोपळ्यावर 'पंचायत'चं नाव, व्हिडीओ व्हायरल

वेब सीरिजचं हटके प्रमोशन

पंचायत-3 या वेब सीरिजच्या टीमनं या वेब सीरिज प्रमोशन हटके पद्धतीनं केलं आहे. काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की,भाजी मंडईतील दुधीभोपळ्यांवर पंचायत वेब सीरिजचं नाव आणि रिलीज डेट लिहिली आहे.

Panchayat Season 3
Panchayat 3: 'पंचायत'मधील फुलेरा गावाच्या सचिव पदाची पोस्ट रिक्त, नीना गुप्तांनी मागवले अर्ज, पोस्ट चर्चेत

Related Stories

No stories found.