Movie Review : सुनील सुकथनकरांनी केले सुमित पाटील याचे कौतुक !

Movie Review : सुनील सुकथनकर यांनी मराठी चित्रपटांवर आपली प्रतिक्रिया दिली , सोशल मीडियावर पोस्ट करून व्यक्त झाले.
Movie Review
Movie Review sakal
Updated on

Movie Review : सुनील सुकथनकर नेहमीच वेगवेगळ्या विषयांवर आपले मत मांडताना दिसतात. त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक चित्रपट, मालिका केल्या. आता त्यांनी मराठी चित्रपटांवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. सोशल मीडियावर पोस्ट करून सुनील सुकथनकर व्यक्त झाले आहेत. नुकताच सुमित पाटील दिग्दर्शित, लिखित आणि निर्मित ‘विषय हार्ड’ हा चित्रपट प्रदर्शित झाला, सुमित पाटीलचा हा पहिलाच मराठी चित्रपट आहे.

कोरोना काळातील टाळेबंदीत प्रेम टिकवण्यासाठी आटापिटा करणाऱ्या प्रेमींची कथा यामध्ये दाखवण्यात आली आहे. अभिनेत्री पर्ण पेठे वगळता चित्रपटातील जवळपास सगळेच चेहरे नवीन आहेत. दिग्दर्शक सुनील सुकथनकर यांनी अलीकडेच हा चित्रपट पाहून यातील दिग्दर्शक सुमित पाटील याचे कौतुक केले आहे. कोल्हापूरच्या तरुणांनी स्वबळावर इतक्या चांगल्या चित्रपटाची निर्मिती करणे, हे खरोखरच कौतुकास्पद आहे, असे सुकथनकर यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.

Movie Review
Akshay Kumar: अक्षय कुमारला करोनाची लागण; अंबानींच्या लग्नसोहळ्याला राहणार गैरहजर, स्वतःला केलं क्वारंटाइन

माझ्या हातातली माझी स्क्रिप्ट्स घेऊन निर्मात्यांची वेळ मागत फिरत असतो. असे असताना ही कोल्हापूरची पोरं टेक्निकली स्मार्ट, निर्मितीमूल्य व्यवस्थित असलेला, प्रत्येक कलाकार युनिक असलेला, मुख्य म्हणजे मनोरंजक असा मराठी चित्रपट त्यांनी आपल्या स्वबळावर काढला. अशा शब्दांत या चित्रपटातील कलाकारांचे आणि सुमित पाटीलचे कौतुक केले. यासोबतच त्यांनी आता रडकेपणाने चर्चा करायची की हा चित्रपट बघायला जायचे ते तुम्ही ठरवा, असा सल्लादेखील प्रेक्षकांना दिला आहे.

Movie Review
Navjot Bandivdekar: 'माणसामधील खरी संस्कृती टिपण्याचा प्रयत्न'..

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.