हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये विविध विषयांवर चित्रपट बनत असले तरी मानवी नातेसंबंध, सामाजिक समस्या तसेच समाजातील विविध प्रश्नांवर बनलेल्या चित्रपटांनी प्रेक्षकांच्या मनामध्ये वेगळे स्थान निर्माण केले आहे. कौटुंबिक नातेसंबंध आणि नात्या-नात्यामध्ये असलेले भेदभाव तसेच धुसपूस आणि हेवेदावे अशा विषयांवर आलेल्या चित्रपटांनी सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.