Mrunal Dusanis: "मी पुन्हा मंदार दादाबरोबर काम करू शकत नाही"; त्या घटनेबाबत मृणालने मांडलं मत

Mrunal Dusanis: हे मन बावरे या मालिकेदरम्यान अनेक कलाकारांचं मानधन निर्मात्यांनी थकवलं होतं. यामध्ये मृणालचाही समावेश होता.
"मी पुन्हा मंदार दादाबरोबर काम करू शकत नाही"; त्या घटनेबाबत मृणालने मांडलं मत
"मी पुन्हा मंदार दादाबरोबर काम करू शकत नाही"; त्या घटनेबाबत मृणालने मांडलं मत esakal
Updated on

Mrunal Dusanis: 'हे मन बावरे','माझिया प्रियाला प्रीत कळेना', 'अस्सं सासर सुरेख बाई' या मालिकेतून प्रेक्षकांची मनं जिंकत अभिनेत्री मृणाल दुसानिसने (Mrunal Dusanis) स्वतःचा एक वेगळा चाहतावर्ग निर्माण केलाय. उत्तम अभिनेत्री म्हणून ओळख मिळवलेली मृणाल चार वर्षानंतर भारतात परत आली. कलर्स मराठीवरील हे मन बावरे या मालिकेदरम्यान अनेक कलाकारांचं मानधन निर्मात्यांनी थकवलं होतं. यामध्ये मृणालचाही समावेश होता. याबाबत नुकतंच तिने सेलिब्रिटी कट्टाला दिलेल्या मुलाखतीत तिने याविषयी खुलासा केला.

काय म्हणाली मृणाल?

मृणालला हे मन बावरे या शोदरम्यान घडलेल्या घटनेबाबत प्रश्न विचारण्यात आला. ती म्हणाली,"आता या घटनेबाबत बोलून काहीच फायदा नाही. कारण, जो काही फायदा व्हायचा होता तो तेव्हा होणं गरजेचं होतं. मी त्या मालिकेत अतिशय मनापासून काम केलं होतं. माझे बाबा तेव्हा आजारी होते. मी त्यांना वेळ देऊ शकले नाही. त्यामुळे मी थोडीशी हळवी झाले होते. मी फारच नाजूक मनस्थितीत होते कारण, सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट शेअर करणं हा माझा स्वभाव कधीच नव्हता. कलाकारांचं कसं असतं…काम सुरूये तोपर्यंत त्यांना पैसे मिळत असतात एकदा काम संपलं की, पुढचं काम मिळेपर्यंत सगळं नियोजन करावं लागतं. माझ्या तेव्हा इन्व्हेस्टमेंट वगैरे काहीच नव्हत्या. जेव्हापासून मला कळू लागलं तेव्हापासून माझा खर्च मी करते. तेव्हा माझ्या वडिलांचे शेवटचे दिवस असूनही मला कुटुंबाला वेळ देता नाही आला. ते मला भेटायला बोलवत होते पण मी गेले नाही. मी व्यवस्थित काम केलं पण मला माझे पैसे मिळाले नाहीत. शशांकला एकट्याला त्याचे पैसे परत मिळाले पण त्याचा अजून टीडीएस मिळाला नाहीये. पण फक्त एकट्याचे पैसे देऊन काही होत नाहीत. त्यांनी इतरांचे अर्धे पैसे तरी द्यायला हवे होते. आता या पुढे मी आर्थिक गोष्टींवर अजून बारकाईने लक्ष देणार आहे. सगळ्याच प्रॉडक्शन हाऊसमध्ये अशी परिस्थिती नसते. मला या आधी असा अनुभव आला नव्हता. त्यामुळे माझ्यासाठी हा अनुभव खूप शॉकिंग होता. मला अनेकांनी ही मालिका करण्याआधी अलर्ट केलं होतं. पण मी तेव्हा ऐकलं नाही. ही एक गोष्ट सोडली तर तो एक उत्तम दिग्दर्शक आहे. त्याने माझी पहिली ऑडिशन घेतली होती. याच्याबरोबर पुढे प्रॉडक्शन म्हणून मी काम करू शकणार नाही पण दिग्दर्शक म्हणून तो ग्रेटच आहे."

काय घडलं होतं नेमकं?

हे मन बावरे या कलर्स मराठीवरील मालिकेची निर्मिती मंदार देवस्थळी यांच्या निर्मिती संस्थेने केली होती. मालिका संपल्यानंतरही मालिकेत काम करणाऱ्या अनेक कलाकारांचं मानधन त्यांना देण्यात आलं नव्हतं. अनेक महिने कलाकारांनी मागणी करूनही त्यांचे पैसे देण्यात आलं नाही. काही कलाकारांनी एकत्र येत याबाबत सोशल मीडियावर पोस्ट लिहिली. मंदार देवस्थळी यांच्याकडे पैशांची मागणी केली. मंदार यांनी त्यांच्याकडे पैसे नसल्याचं जाहीर केलं पण नंतर चॅनेलने पैसे देऊनही अनेक कलाकारांचे पैसे अजूनही देण्यात आलेले नाहीयेत.

"मी पुन्हा मंदार दादाबरोबर काम करू शकत नाही"; त्या घटनेबाबत मृणालने मांडलं मत
Shashank Ketkar And Mrunal Dusanis: मृणाल-शशांक पुन्हा दिसणार नव्या मालिकेत? सोशल मीडियावरील फोटो पाहून नेटकरी खुश

मृणाल आता तिच्या कुटूंबाबरोबर कायमची भारतात परतली असून लवकरच ती पुन्हा काम सुरु करणार असल्याचं तिने या मुलाखतीत सांगितलं. त्यांना त्यांच्या मुलीला परदेशातील वातावरणात वाढवायचं नव्हतं. भारतीय संस्कार व्हावेत अशी त्यांची इच्छा होती म्हणून ती लहान असतानाच त्यांनी अमेरिका सोडून पुन्हा भारतात परतण्याचा विचार केला असं ती म्हणाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.